लोकायुक्तांनी घोटाळ्यांची मालिका उघडकीस आणल्यावरही मुख्यमंत्र्यांचे मौन- आप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

सरकारच्या निष्क्रियतेमुळे लोकायुक्त इतके निराश झाले आहेत की त्यांनी आपले सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मायकल लोबो यांच्याविषयी लोकायुक्तांच्या टीकेवर मुख्यमंत्री सावंत यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले.

पणजी- लोकायुक्तांनी राज्यात होणाऱ्या घोटाळ्यांची मालिकाच उघडकीस आणली. तरीही राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचे आरोप 'आप'कडून करण्यात आले आहेत.  

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत 'आप'चे प्रवक्ते राहूल म्हांब्रे म्हणाले, सरकारच्या निष्क्रियतेमुळे लोकायुक्त इतके निराश झाले आहेत की त्यांनी आपले सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मायकल लोबो यांच्याविषयी लोकायुक्तांच्या टीकेवर मुख्यमंत्री सावंत यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. लोकायुक्तांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मायकेल लोबो मंत्री म्हणून अयोग्य असून सावंत यांनी तरीही यावर मौन बाळगले आहे.

मायकल लोबो यांच्याकडे लोकायुक्तांच्या हेतूंवर प्रश्न विचारण्याचा निर्धार आहे कारण त्यांना माहित आहे की भाजप सरकार त्यांच्या संरक्षणासाठी सर्व काही करेल. “न्यायमूर्ती पी.के.मिश्रा यांनी लेबर गेटपासून ते बीच साफसफाईच्या घोटाळ्यापर्यंतच्या अनेक घोटाळ्यांच्या विरोधात थेट आदेश दिले आहेत. 

आम्ही आता मुख्यमंत्री सावंत यावर काय कारवाई करतील यावर लक्ष ठेऊन आहोत. ते लोबो यांना मंत्रीपदावर कसे राहू देऊ शकतात. लोबोंच्या क्षमतेवर लोकायुक्तांनी  केलेल्या टीकेकडे ते दुर्लक्ष कसे करू शकतील, असा सवाल म्हांब्रे यांनी यावेळी उपस्थित केला. 

संबंधित बातम्या