पोरक्या विनीताला बालदिनी मिळाला पालकत्वाचा आधार..!

आई वडिलांविना पोरक्या झालेल्या विनीताच्या आयुष्याला मिळाली कलाटणी..
Children Day Special : भुईपाल येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शैक्षणिक स्तरावर मदत करण्यासाठी दत्तक घेतलेल्या विनीता विठ्ठल वरक व तीची आजी गंगुबाई हीच्या सोबत बि डी मोटे
Children Day Special : भुईपाल येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शैक्षणिक स्तरावर मदत करण्यासाठी दत्तक घेतलेल्या विनीता विठ्ठल वरक व तीची आजी गंगुबाई हीच्या सोबत बि डी मोटेDainik Gomantak

पिसुर्ले : भुईपाल भेडशेवाडा येथिल आणि सरकारी माध्यमिक विद्यालय भुईपाल येथे शिक्षण घेणाऱ्या आई वडिलाविना पोरक्या झालेल्या धनगर समाजातील विनीता विठ्ठल वरक या इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी तीच्या शैक्षणिक स्तरावरील गरजा पूर्ण करण्यासाठी बाल दिनाचे (Children Day Special) औचित्य साधून पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून तीला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या संबंधीची घोषणा काल दि 14 रोजी संपन्न झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे.

Children Day Special : भुईपाल येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शैक्षणिक स्तरावर मदत करण्यासाठी दत्तक घेतलेल्या विनीता विठ्ठल वरक व तीची आजी गंगुबाई हीच्या सोबत बि डी मोटे
उन पावसाच्या खेळासोबत शेतकऱ्यांची कसरत..!

या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डिचोली तालुक्यातील समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक, गोवा धनगर समाज सेवा संघाचे सचिव पवन वरक, माजी सचिव बया वरक, म्हालची पांढरी मल्टिपर्पज सहकारी संस्थेचे सचिव उदय वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष मोटे यांनी सांगितले की ज्या समाजात आम्ही जन्म घेतला त्या समाजाचे देणे आम्ही फेडले पाहिजे, त्याचे अनुकरण करताना गेल्या कित्येक वर्षांपासून समाजाकि क्षेत्रात कार्यरत असताना समाजातील काही कुटुंबाच्या व्यथा जवळून पाहिलेल्या आहेत. सदर समस्या दुर करण्याचा प्रयत्न सेवा संघाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन सुरू आहे, परंतू सेवा संघाच्या वतीने मदत करताना काही मर्यादा येत असतात, त्यामुळे आई वडिलांचे निधन झाल्यानंतर सुमारे सत्तर वर्षांच्या आजीचा भार बनलेल्या कु विनीता विठ्ठल वरक या इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला शिक्षणासाठी काहीच कमी पडू नये आणि तीने शिक्षणात गरूड भरारी घ्यावी या हेतूने आजच्या दिनाचे औचित्य साधून तीच्या शैक्षणिक स्तरावरील गरजा पूर्ण करण्यासाठी पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे.

Children Day Special : भुईपाल येथे संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शैक्षणिक स्तरावर मदत करण्यासाठी दत्तक घेतलेल्या विनीता विठ्ठल वरक व तीची आजी गंगुबाई हीच्या सोबत बि डी मोटे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात युती होणारच; चर्चिल आलेमाव

त्याच प्रमाणे आज पर्यंत सत्तरी तालुक्यातील धनगर समाजातील मुलीना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने हातभार लावला आहे, त्या पैकी काही मुली उच्च पदावरील पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या आहेत, तर काही जणी अजून शिक्षण घेत असल्याचे शेवटी मोटे यांनी स्पष्ट केले.

बि डी मोटे यांची प्रेरणा इतरांनी घ्यावी - दिलीप वरक

यावेळी आपले विचार व्यक्त करताना डिचोली धनगर समाजाचे अध्यक्ष दिलीप वरक यांनी सांगितले की समाजात अवघीच काही माणसे समाजाच्या उत्कर्षासाठी आणि दिशा देण्याचे कार्य करीत असतात, त्या पैकी सत्तरी धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे यांचे नाव घ्यावेच लागेल, त्याच्याने संस्थेच्या माध्यमातून केलेले सर्वांना बोध घेण्यासारखे आहे. त्यामुळे बि डी मोटे यांची प्रेरणा समाजातील इतरांनी घेऊन अशा महान कार्यांत सहभागी व्हावे असे आवाहन करून त्यांच्याने सुरू केलेल्या कार्या बद्दल अभिनंदन केले.

यावेळी बया वरक, उदय वरक, पवन वरक यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

या वेळी बि डी मोटे यांनी विनीता विठ्ठल वरक हीला तीची आजी गंगुबाई वरक हीच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वरक यांनी केले तर धुळू शेळके यांनी आभार व्यक्त केले.

विनीता विठ्ठल वरक हीची ह्रदयविधारक हीची कहाणी

सरकारी माध्यमिक विद्यालय भुईपाल येथे सद्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विनीता हीच्यावरील लहान पणी मायेचे छत्र हरपले होते, त्या नंतर तीची जबाबदारी तीचे वडील विठ्ठल वरक यांच्या वर आली, पण नियतीच्या चक्रव्यूहातून कोण सुटणार नाही, या प्रमाणे नैराश्याच्या गर्तेत सापडून वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन दोन वर्षांपुर्वी त्यांनाही या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे विनीता हीच्या वरील माता पित्याचे छत्र हरपून तीची जबाबदारी सुमारे 80 वर्षांकडे पोचलेल्या तीची आजी गंगुबाई वरक हीच्यावर आली होती. मात्र या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी घेतलेल्यांने उतार वयात तीच्या आजीवर असलेला भार कमी झाला आहे आणि विनीता हीला शिक्षणात आपले ध्येय गाठण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com