स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचा गोवा सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन गोवा सरकारने पाळले नाही तर ४ जानेवारीपासून पणजीच्या आझाद मैदानावर प्रिया आंदोलन करू असा इशारा स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेने आज येथे दिला.

पणजी: स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन गोवा सरकारने पाळले नाही तर ४ जानेवारीपासून पणजीच्या आझाद मैदानावर प्रिया आंदोलन करू असा इशारा स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेने आज येथे दिला.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी सांगितले,की स्वातंत्र्यसैनिकांची केवळ 97 मुले सरकारी नोकरी पासून वंचित आहेत आम्ही सरकारकडे स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे बसवा किंवा जमिनी द्या अशी मागणी करत नाही.  2000 साली सरकारने रद्द केलेल्या आरक्षणाच्या बदल्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या द्या अशी आमची मागणी आहे.

आणखी वाचा:

गोव्याची शिक्षण क्षेत्रात क्रांती - 

संबंधित बातम्या