मुलांनी भविष्याचा वेध घ्यायला हवा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. जगात आज सर्वत्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांनी भविष्याचा वेध घेणे गरजेचे आहे. निश्‍चित ध्येय व उद्दीष्ट साध्य करताना मुलांनी प्रामाणिकपणा व जिद्द या गोष्टी सोडता कामा नये , असे उद्‌गार समाज कल्याण खात्याचे संचालक उमेशचंद्र जोशी यांनी काढले. 

पणजी :  सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. जगात आज सर्वत्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांनी भविष्याचा वेध घेणे गरजेचे आहे. निश्‍चित ध्येय व उद्दीष्ट साध्य करताना मुलांनी प्रामाणिकपणा व जिद्द या गोष्टी सोडता कामा नये. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला सत्कार सोहळा हा त्यांना स्फूर्ती व ऊर्जा देण्यासाठी असतो. हाच उद्देश ठेवून सोशल वेलफेअर संचालनालयातर्फे हा सत्कार सोहळा आयोजित करून कौतुकाची थाप मिळविली आहे, असे उद्‌गार समाज कल्याण खात्याचे संचालक उमेशचंद्र जोशी यांनी काढले.

समाज कल्याण खात्याचे कर्मचारी, को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे भागधारक यांच्या मुलांसाठी नुकत्याच आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात संचालक जोशी बोलत होते. यावेळी उपसंचालक सांतानो फर्नांडिस, को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत नार्वेकर उपस्थित होते.या कार्यक्रमात सोशल वेलफेअर संचालनालयातील कर्मचाऱ्यांची व को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे भागधारक यांच्या गुणवंत मुलांसाठी संचालनातर्फे प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. 

संचालक जोशी यांनी सांगितले की, मुलांना जर आपल्या पालकांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर अभ्यासाचे ध्येय बाळगून झोकून देऊन उच्चशिक्षित होणे गरजेचे आहे. आज शिक्षणाशिवाय पर्याय राहिला नसल्याने खूप परीश्रम घेऊन उच्चविद्याविभूषीत व्हावे, तरच आपल्या पालकांना समाधान मिळणार आहे. शिक्षणाची संधी हातातून निघून गेल्यास आयुष्यभर पश्‍चातापाशिवाय पर्याय नसतो. म्हणून मुलांनी गांभीर्याने मोबाईल-व्हॉटसअप या गोष्टींकडे अधिक लक्ष न देता शिक्षणासाठी वेळ द्यावा.

को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष नार्वेकर यांनी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाज कल्याण खात्याचे आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या