पालकांना दिलासा 5 वर्षांखालील मुलांना मास्कची गरज नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा महासंचालनालयातर्फे काल जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाच वर्षांखालील मुलांना कोरोना महामारीच्या(Covid-19) काळात मास्क लावण्याची गरज नाही.

पणजी:  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Union Ministry of Health) आरोग्य सेवा महासंचालनालयातर्फे काल जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाच वर्षांखालील मुलांना कोरोना महामारीच्या(Covid-19) काळात मास्क लावण्याची गरज नाही. तसेच 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनी डॉक्टर किंवा पालकांच्या देखरेखीखाली मास्क वापरावा, असे या मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. (Children under the age of 5 do not need a mask) 

Covid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू 

या विषयावर डॉ.  शेखर साळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की कोरोनाची बाधा लहान मुलांना क्वचीतच होते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तज्ञांनी सुचवल्यानंतर त्यानुसार हा आदेश काढला असावा. लहान मुलांना मास्कची गरज नाही. मात्र, 6 वर्षांवरील मुलांना मास्क वापरताना तो स्वच्छ असावाच. त्याचबरोबर तो योग्यप्रकारे बांधलेलाही असावा. मास्क घाण वा तोंडाला अयोग्य लावलेला असल्यास तो  असूनही फायदा होणार नाही. मास्क योग्यप्रकारे  लावण्यावर बरेच काही अवलंबून आहे. कोरोनाची तिसरी लाट आली आणि त्यामुळे मुलांना त्रास होऊ लागला, तर त्यावेळी तज्ञांना योग्य वाटतील ती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील.

IVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या 

काणकोणात 15 नवे कोरोना रुग्ण
काणकोणात आज 15 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. बुधवारी 7, मंगळवारी 14 रुग्ण सापडले होते. सोमवारी  एकही कोविड रुग्ण काणकोणात सापडला नाही. गेल्या बुधवारी 22 कोरोनाग्रस्त सापडले होते. मंगळवारी 38  कोरोना पिडीत सापडले होते, तर सोमवारी फक्त 9 कोरोना रुग्ण सापडले होते. रुग्णांच्या संख्येत दरदिवशी चढ उतार होत आहे.  पालिका क्षेत्रात 9, गावडोंगरी 1 व खोला पंचायत क्षेत्रात 5 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3005 झाली आहे. आतापर्यंत 2996 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या काणकोणात 37 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 33 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या