गोव्‍याच्‍या पर्यटनाला ‘चिपी’चे आव्‍हान‍!

तूर्तास गोव्याला चिपीचा धोका नाही मात्र काळाची पावले ओळखून उपाययोजना आखणे गरजेचे
गोव्‍याच्‍या पर्यटनाला ‘चिपी’चे आव्‍हान‍!
Chipi Airport Challenges Goa TourismDainik Gomantak

मडगाव: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळामुळे (Sindhudurg Chipi Airport) गोव्याच्या पर्यटनावर (Goa Tourism) आत्ताच परिणाम संभवत नाही. मात्र गोव्याने आपली पर्यटन विषयक धोरणे बदलली नाहीत व पर्यटक फ्रेंडली भूमिका घेतली नाही तर भविष्यात ही निश्चितच धोक्याची घंटा ठरणार आहे, असे मत राज्‍यातील पर्यटन उद्योग क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. चिपी विमानतळ (Chipi Airport) सुरू झाले असले आणि तिथे पाच नवीन तारांकित हॉटेल्सही उभी राहिली असली तरी अजून तिथे पर्यटनासाठी पोषक वातावरण तयार झालेले नाही. हीच गोष्ट गोव्याच्या पथ्यावर पडणारी आहे, असेही बोलले जात आहे.

गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले, पर्यटन जगात गोवा हे अजूनही ब्रँड नाव आहे. हे नाव कमवायला गोव्याला 40 वर्षे लागली. चिपीमुळे कोकणातही पर्यटक निश्चित वाढतील, पण गोव्याची जागा घेण्यासाठी त्यांना बरीच वर्षे वाट पाहावी लागेल. मात्र आता गोव्याला आणखी एक जवळचा प्रतिस्पर्धी तयार झाल्याने आपण पुढचा विचार करायला हवा.

Chipi Airport Challenges Goa Tourism
गोव्यात पर्यटन खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या हेलिपॅड चे उदघाटन

गोव्यापासून अवघ्या 50 ते 80 किलोमीटर अंतरावर आता पर्यटकांना नवीन पर्याय उपलब्ध असेल. जर टॅक्सीवाल्यांकडून पर्यटकांची होणारी लुबाडणूक, पोलिसांकडून होणारी सतावणूक थांबली नाही तर पर्यटक कोकणात वळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पर्यटन जगात गोवा हे अजूनही ब्रँड नाव आहे. ते कमवायला गोव्याला 40 वर्षे लागली. चिपीमुळे कोकणात पर्यटक निश्चित वाढतील, पण गोव्याची जागा घेण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागतील. मात्र टॅक्सीचालकांकडून होणारी लुबाडणूक व पोलिसांकडून होणारी सतावणूक थांबली नाही तर पर्यटक कोकणाकडे वळतील.

- नीलेश शहा, गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष

बहुतांश पर्यटक गोव्यात येतात ते निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याबरोबरच दारू पिण्यासाठी. गोव्यात जशी स्वस्त दारू मिळते, तशी महाराष्ट्रात मिळणे कठीण आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी गोवा हेच मुख्य आकर्षण असेल. महाराष्ट्राने गोव्यासारखी काहीशी मोकळी संस्कृती अंगीकारली तरच गोव्यात येणारा पर्यटक कोकणाकडे वळेल.

- सेराफिन कोता, लहान आणि मध्यम हॉटेल्सचालक संघटनेचे अध्यक्ष

Chipi Airport Challenges Goa Tourism
Goa: यंदाच्‍या पर्यटन हंगामात शॅक्‍स वाढण्याची शक्यता

गोव्‍यासाठी काही सकारात्‍मक बाबी

आत्ताच सुरू झालेला चिपी विमानतळ किंवा भविष्यात सुरू होणारा मोपा विमानतळ याकडे गोव्यातील पर्यटन उद्योगाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

चिपीमुळे कोकणात पर्यटक उतरणार असले तरी ते एकाच ठिकाणी जास्त काळ राहणार नाहीत. सिंधुदुर्ग आणि गोवा जवळजवळ असल्‍याने दोन्‍ही ठिकाणचे पर्यटक दोन्‍ही ठिकाणी जातील.

त्यामुळे सध्‍या तरी गोव्याने चिंता करण्याची गरज नाही. चिपी आणि मोपामुळे दक्षिण गोव्यात येणारे पर्यटक कमी होतील ही भीतीही व्यर्थ आहे.

कारण दक्षिण गोव्यात उच्च दर्जाची हॉटेल्स आहेत, तशी दुसरीकडे नाहीत. त्यामुळे चांगले पर्यटक दक्षिण गोव्यालाच पसंती देतील, असे शहा म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com