Chorla Ghat : चोर्ला घाटात परराज्यातील वाहनचालकांचे ‘प्रताप’ वाढले; इतर चालकांना नाहक त्रास

वाहतूक कोंडीला कारण; नित्याचीच बनली हमरीतुमरी
Chorla Ghat Tourist Fight
Chorla Ghat Tourist Fight Dainik Gomantak

पणजी : चोर्ला घाटात एखादे वाहन आडवे झाल्यास, रस्त्याच्या मधोमध बंद पडलेच किंवा अपघात झाल्यास वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. परंतु आता नवे कारण पुढे आले आहे, ते म्हणजे वाहनधारकांच्या हमरीतुमरीचे प्रकार. हे प्रकार अधून-मधून घाटात सतत घडतात, त्यात काय नवे, असे या मार्गावरून नित्यनियमाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे हा अनुभव. (Chorla Ghat Tourist Fight)

रविवारी कर्नाटकातून गोव्याकडे परतत असताना दुपारी तेलंगाणा आणि महाराष्ट्र राज्यात नोंदीत असलेल्या वाहनधारकांची वाहनाला वाट न देण्याच्या कारणावरून धरपकड सुरू झाली. त्यात महाराष्ट्रातील वाहन चालकाच्या डोक्यात थोडीशी नशा होती, त्या वाहनाच्या मागे तेलंगाणा नोंदीत असलेले वाहन होते. त्या वाहनात महिला व इतर काहीजण असल्याने महाराष्ट्र वाहनधारकाला आणखी चढली. त्याने थेट तेलंगणाच्या वाहनधारकाची धरपकड सुरू केली. एकमेकांनी एकमेकांच्या सदऱ्याची कॉलर ओढण्यास सुरुवात केली.

वादावादीनंतर आले हातघाईवर!

प्रकरण हातघाईवर येऊ नये म्हणून त्या-त्या वाहनातील लोक आपापल्या व्यक्तीला ओढत होते आणि वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु लोक अधिक जमल्याने हा प्रकार अधिकच वाढू लागला, अखेर वाहनधारकांच्या वाहनांच्या हॉर्नचे आवाज होऊ लागल्याने ही हातघाई सुटली. चोर्ला घाटात असे प्रकार आता नित्याचेच झाले की काय असा संशय व्यक्त होतो. मोठी वाहने आली तरी नेहमीच असे प्रकार घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com