चोर्ला घाटातून अवजड वाहतुकीला परवानगी..!

जुलैमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गोवा आणि बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
चोर्ला घाटातून अवजड वाहतुकीला परवानगी..!
Chorla Ghat Update : Heavy traffic running through Chorla Ghat.Dainik Gomantak

पणजी: चोर्ला घाट ते बेळगाव (Chorla Ghat Update) या रस्त्याची दयनीय अवस्था असतानाही उत्तर गोवाच्या जिल्‍हाधिकाऱ्यांनी केरी ते बेळगाव जाणाऱ्या वाहनांना रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वर्दळ वाढणार आहे.

Chorla Ghat Update : Heavy traffic running through Chorla Ghat.
'आमदार म्हणून निवडून आल्यास प्राधान्याने बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार'

जुलैमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गोवा आणि बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही. त्‍यामुळे या मार्गावर अनेक अवजड वाहने धावत असून रविवारी तीन अपघात झाले होते. आता पुन्हा या मार्गावर अपघातांची मालिका सुरू होणार आहे. सर्व अपघातांमध्ये अवजड वाहनांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अवजड वाहतुकीवर कारवाई का होत नाही, असा स्थानिकांचा प्रश्‍न आहे. अनमोड घाटातून अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही.

Chorla Ghat Update : Heavy traffic running through Chorla Ghat.
भाजप सरकारने केला गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांचा स्वप्नभंग: दिगंबर कामत

रामनगर ते गोवा हद्दीपर्यंतच्या महामार्ग रूंदीकरणाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे परवानगी नसतानाही चोर्ला महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे.

...म्‍हणूनच दिली परवानगी?

बंदी असतानाही या महामार्गावर 20 चाकी वाहनेही धावत आहेत. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात ‘डोलोमाईट’ची वाहतूक होत असल्याचे समजते. हा माल सध्या गोव्‍यातील कंपन्यांना पुरवला जात असून अवघ्या चार महिन्यांत हा रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय कर्नाटकातून खडीची वाहतूक करण्यासाठीच अवजड वाहनांना परवानगी दिल्याचा आरोप होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com