
Goa Shigmotsav 2023: धारबांदोडा तालुक्यात साकोर्डा, तांबडी सुर्ल, धारगे, तयडे, कारेमळ, मातकण, सुर्ला, मधलावाडा, बोरीयाळ या गावांमध्ये गुरुवारी पारंपरिक रितीरिवाजानुसार चोरोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
तयडे ग्रामस्थांचे जागृत आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातेरी ब्राह्मणी, केळबाय मंदिरांच्या प्रांगणात होळी साजरी करण्याची जुनी प्रथा आहे.
ग्रामस्थांनी या प्रथेचा वारसा जोपासला असून तो यापुढे असाच अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प तरुण पिढीने आखलेला आहे.
या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गौरीचा बाळ.’ गावातील मुलींकडून गौरीचा बाळ उत्सव उत्साही वातावरणात साजरा केला जातो. सहाव्या दिवशी संपूर्ण धारबांदोडा तालुक्यात अनोख्या पद्धतीने फुलोत्सव साजरा करण्यात येतो.
फुलोत्सवात होमकुंड, करवली, घोडेमोडणी, रणमाले, जती, सोकारती अशा विविध सांस्कृतिक कलांचे दर्शन घडते. स्थानिक कलाकार रणमाले सादर करायचे.
पूर्वी रणमाले पहाटेपर्यंत चालायचे. मात्र, हल्ली रणमाले सादर केल्यानंतर दशावतारी नाटक हाेते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.