चौगुले कंपनीच्या सीईओपदी राजीव बोरा यांची नियुक्ती

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

चौगुले उद्योग समूहाचा भाग असलेल्या चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (सीसीपीएल)ने आपल्या खाण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजीव बोरा यांची नियुक्ती केली आहे.

पणजी : चौगुले उद्योग समूहाचा भाग असलेल्या चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (सीसीपीएल)ने आपल्या खाण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजीव बोरा यांची नियुक्ती केली आहे. समूहाच्या खाण उद्योगाचे नवे धोरण आणि या क्षेत्रात देशव्यापी ठसा उमटवण्यासाठी बोरा हे या विभागाचे नेतृत्व करतील.

कंपनीने हल्लीच मध्य प्रदेशातील शहापूर (पूर्व) खाणीतील कोळसा उत्खननासाठीची व्यावसायिक निविदा प्राप्त केली आहे. बोरा यांना भारत, झाम्बिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये २२ वर्षांहून अधिकचा खाण व्यवसाय क्षेत्रातील अनुभव आहे. १९९८ मध्ये त्यांनी वेदांता रिसोर्सेसमधून आपल्या करिअरला सुरवात केली होती.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या