गोवा सहकार भांडारतर्फे नाताळसाठी कुपन योजना

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशन लिमिटेडच्या माध्यमातून राज्यातील गोवा सहकार भांडारांच्या केंद्रातून ख्रिसमस (नाताळ) निमित्त कुपन योजना जाहीर

पणजी: गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशन लिमिटेडच्या माध्यमातून राज्यातील गोवा सहकार भांडारांच्या केंद्रातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस (नाताळ) निमित्त बक्षीस कुपन योजना जाहीर करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांनी आज दिली.  

नाईक म्हणाले की, फेडरेशन प्रत्येक वर्षी विविध सणांसाठी बक्षीस कुपन योजना आणते. त्या योजनेद्वारे राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या सहकार भांडारातून मोठी उलाढाल होत असते. यंदाच्या नाताळानिमित्त फेडरेशनने एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक बक्षीस कुपन दिले जाणार आहे.

आजपासून या कुपन योजनेला प्रारंभ झाला असून, १५ जानेवारी २०२१ पर्यंत ही कुपन योजना सुरू राहणार आहे. ग्राहकांनी मिळणाऱ्या कूपनवर नाव आणि मोबाईल क्रमांक लिहून बॉक्समध्ये ते टाकावयाचे आहे.  या योजनेत पहिले बक्षीस एलईडी टीव्ही, दुसरे रेफ्रिजरेटर, तिसरे बक्षीस वॉशिंग मशिन असेल. त्याचबरोबर १८ उत्तेजनार्थ बक्षीस असेल. जानेवारी महिन्यात या स्पर्धेचा ड्रॉ काढला जाईल. ग्राहकांनी या योजनेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले. फेडरेशनची वार्षिक उलाढाल ८० कोटींची आहे. यंदा ३० टक्क्यांनी व्यापार वाढला असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या