चर्चिल आणि वालांका लवकरच तृणमूलवासी

चर्चिल आलेमाव यांच्यासह त्यांच्या कन्या वालंका आलेमाव नावेलीतून लढण्याची शक्यता, प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा
चर्चिल आणि वालांका लवकरच तृणमूलवासी
Churchill Alemao and Walanka will soon join Trinamool congressDainik Gomantak

मडगाव: विधानसभा निवडणुकीसाठी अवघे साडेतीन महिने बाकी असताना दक्षिण गोव्यात राजकीय हालचाली वेगवान झाल्या असून बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्यासह त्यांच्या कन्या वालंका आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचे निश्चित केले आहे. चर्चिल यांना बाणावलीत तर वालंका यांना तृणमुलची नावेलीत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे.

Churchill Alemao and Walanka will soon join  Trinamool congress
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा कसोटीचा काळ

आय पॅकचे प्रशांत किशोर यांच्या बरोबर बोलणी झाल्यावर ही डिल पक्की झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संबंधी चर्चिल आलेमाव यांना विचारले तर विधानसभा निवडणुक आली, की अशा प्रकारची बोलणी होतेच, मात्र मी अजून कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले. चर्चिल आलेमाव हे जरी आपले पत्ते उघड करत नसले तरी त्यांच्या समर्थकांची मात्र डिल झाली आहे. फक्त प्रवेशाचा मुहूर्त नक्की झालेला नाही, असे सांगतात. आलेमाव यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याना आपला निर्णय कळविला असून कार्यकर्त्यांनीही त्यांना तृणमूलमध्ये जाण्याची मान्यता दिली आहे.

Churchill Alemao and Walanka will soon join  Trinamool congress
गोमंतकीयांच्या जीवननाचा आधार; म्हादई

सध्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती 31ऑक्टोबरपर्यंत जाहीर करावी, अन्यथा आपण आपला निर्णय घ्यायला मोकळा आहे, असे सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सबुरीने घेण्याची सूचना केल्यावर दिवाळीपर्यंत आपण वाट पाहू, असे त्यांनी सांगितले होते. अजून युतीची घोषणा होत नाही, हे कारण पुढे करून आता चर्चिल तृणमुलवासी होतील, अशी माहिती मिळाली आहे. यापूर्वी चर्चिलने काँग्रेस राष्ट्रवादी युतीत नावेलींची जागा आपली कन्या वालांका आलेमाव हिला मागितली होती. मात्र ही मागणी मान्य होणे कठीण वाटल्यानेच त्यांनी तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com