'सुभाष वेलिंगकरांवर ओल्ड गोव्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घाला' 

चर्चिल आलेमाव यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी
'सुभाष वेलिंगकरांवर ओल्ड गोव्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घाला' 
Churchill Alemao Complains against Subhash Velingkar Dainik Gomantak

मडगाव : हिंदू रक्षा महाआघाडीचे नेते सुभाष वेलिंगकर हे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरूद्ध मानहानीकारक वक्तव्य करून गोव्यात धार्मिक तणाव निर्माण करु शकतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही शक्यता गृहीत धरून वेलींगकर यांच्यावर ओल्ड गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घालावी, अशी मागणी बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली आहे.

Churchill Alemao Complains against Subhash Velingkar
सुभाष वेलिंगकर दुसरे इंक्विजिशन आणू पाहत आहे : फादर व्हिक्टर फेर्राव

वार्का येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत चर्चिल आलेमाव यांनी श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावर पर्रीकर सरकार असताना राज्यात प्रवेश बंदी घातली होती तशीच वेलिंगकर यांच्यावरही घालण्यात यावी अशी मागणी केली.

आलेमाव यांनी आज वेलींगकर यांच्याविरोधात कोलवा पोलिस स्थानकात आणखी एक तक्रार दिली असून या तक्रारीची दखल घेऊन वेलिंगकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा अन्यथा आपण न्यायालयात त्यासाठी धाव घेण्यास मागे पुढे पाहणार नाही असे आलेमाव यांनी सांगितले. आपल्यावतीने अॅड. राधाराव ग्रासियस खटला लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Churchill Alemao Complains against Subhash Velingkar
म्हापशात अहोरात्र बेघरांचा मुक्तसंचार

धार्मिक कलह माजविणारे वक्तव्य केल्याने तसेच दुसऱ्या धर्माची वेलिंगकर यांनी निंदा केल्याने त्यांच्या विरोधात भा.दं.सं.च्या 153, 153 अ, 295 अ व 298 कलमाखाली गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.

एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत फ्रान्सिस झेव्हीयर हेच गोव्याचे रक्षणकर्ते असून सुभाष वेलिंगकर यांना त्यांचे येथे असलेले अस्तित्व मान्य नसल्यास त्यांनी गोवा सोडून जावे, असा सल्ला आलेमाव यांनी दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.