Churchill Alemao Resigned: अखेर चर्चिल आलेमाव यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

गोवा खंडपीठाने अध्यक्षपद सोडण्याचे आदेश दिले होते
Churchill Alemao
Churchill Alemao

चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आपण आदर करतो असे आलेमाव यांनी म्हटले आहे. चर्चिल यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याने त्वरित अध्यक्षपद सोडावे असे आदेश गोवा खंडपीठाने दिले. त्यानंतर अखेर चर्चिल आलेमाव यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच निर्णय घेत आपला राजीनामा दिला आहे. (Churchill Alemao Resigned as president of Goa football Association)

Churchill Alemao
Curlie's Night Club: वादग्रस्त कर्लिस नाईट क्लब होणार जमीनदोस्त

चर्चिल आलेमाव यांनी 16 मे 2019 रोजी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याने त्यांना त्वरित अध्यक्षपद सोडण्याचा आदेश गोवा खंडपीठाने दिले. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा गोपनीयतेने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार नाही. असेही गोवा खंडपीठाने म्हटले आहे.

दरम्यान, कही दिवसांपूर्वी वालांका चर्चिल देखील भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीत निवडून आल्या. 85 वर्षांची परंपरा मोडीत काढत एक महिला महासंघाच्या कार्यकारिणीत समाविष्ट झाल्याने वालांका यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण, त्याचवेळी त्यांच्यावर घराणेशाहीचा देखील शिक्का मारण्यात आला आहे.

Churchill Alemao
Goa Weather Update: 12 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com