बाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

बाणावली मतदारसंघातील जनतेसाठी लवकरच  आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जाहीर केले आहे.

मडगाव ः  बाणावली मतदारसंघातील जनतेसाठी लवकरच  आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जाहीर केले आहे. बाणावली येथे दांडो मैदानाजवळ रस्त्याच्या हाॅटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाणावलीच्या सरपंच वेन्सिला फर्नांडिस, मिनीन फर्नांडिस व बाणावलीचे ग्रामस्थ उपस्थित होते. (Churchill Alemao said that a health center will be set up in Banawali)

बाणावली मतदारसंघातील बाणावली, सुरावली व कोलवाच्या नागरिकांना कासावली आरोग्य केंद्रात, तर वार्का, ओरली, केळशी - करमणे गावातील नागरिकांना चिंचिणी आरोग्य केंद्रात जावे लागते. ही आरोग्य केंद्रे दूर असल्याने बाणावली मतदारसंघातील नागरिकांना त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी बाणावली येथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रात डायलिसीसची सुविधा असेल, असे आलेमाव यांनी सांगितले. 

मुरगाव: लोहखनिज भरताना मुरगाव बंदरावर बार्ज बुडाली

बाणावलीतील (Banavali goa) अंतर्गात रस्त्यांचे 6 कोटी रुपये खर्चून हाॅटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. आज दांडो (Dando) मैदानाजवळचे काम हाती घेण्यात आले असून येत्या काही दिवसंता इतर अंतर्गात रस्त्यांच्या हाॅटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात येईल, असे आलेमाव यांनी सांगितले. (Goa)

संबंधित बातम्या