गोव्यात चित्रपटगृहे आता पूर्ण क्षमतेने खुली होणार

सिनेरसिकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आनंदाची वार्ता, इफ्फीच्या (Iffi) सगळ्या सिनेमागृहांना (Theaters) 100 टक्के आसन क्षमतेने सिनेमे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हिरवा कंदील दाखवला.
गोव्यात चित्रपटगृहे आता पूर्ण क्षमतेने खुली होणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करीत आज संध्याकाळपासूनच सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. Dainik Gomantak

पणजी: 52 व्या इफ्फीतील सिनेप्रदर्शनाला उत्साहात सुरुवात झाली असली तरी कोरोनामुळे सिनेमागृहात (theaters) 50 टक्केच प्रतिनिधींना परवानगी होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रत्येक सिनेगृहाबाहेर मोठ्या रांगा रांगल्या होत्या. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करीत आज संध्याकाळपासूनच सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी इफ्फी (Iffi) परिसराला भेट दिल्यानंतर 50 टक्के क्षमतेची अट मागे घेतल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे सिनेरसिकांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करीत आज संध्याकाळपासूनच सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मल्याळम चॅनेलचे उद्घाटन

इफ्फीच्या पहिल्या दिवशी पावसाने विसावा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिनेरसिकांनी आयनॉक्स आणि गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिसरात उपस्थिती नोंदवल्याचे दिसत होते. मात्र, कोरोनामुळे राज्यातील सर्व सिनेमागृहांना 50 टक्के आसन क्षमतेचे बंधन घातले होते. त्यामुळे इफ्फीतील आयनॉक्सच्या चार आणि मॅकेनिज पॅलेसच्या दोन्ही सिनेगृहांमध्ये एकूण क्षमतेच्या निम्म्या रसिकांनाच परवानगी मिळत होती. सद्यस्थितीत कला अकादमीचे सिनेमागृह हे राज्यातील सर्वांत मोठे आहे. मात्र, यावर्षी कला अकादमीचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे या वास्तूमध्ये सिनेमे दाखवण्यात येत नाहीत. त्यामुळे रसिकांची मोठी गैरसोय होणार होती. पर्वरी येथे सिनेमागृहात व्यवस्था वाढविण्यात आली असली तरी अचानक प्रतिनिधींची वाढलेली संख्या लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले. इफ्फीच्या सगळ्या सिनेमागृहांना 100 टक्के आसन क्षमतेने सिनेमे दाखवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी हस्तक्षेप करीत आज संध्याकाळपासूनच सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
Goa: खाण महामंडळ लवकरच स्थापन करु- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

... त्यामुळे प्रतिनिधींची संख्या वाढली

इफ्फीसाठी यावर्षी सुमारे 2800 सिनेरसिकांनी आपली प्रतिनिधी नोंदणी केली आहे. दरवर्षी हा आकडा साधारणतः पाच हजारांहून अधिक असतो. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे या संख्येत घट झाली. त्यातच यंदा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी मंचावरून प्रसारित होत असल्याने या वर्षी प्रतिनिधी संख्या थोडी कमी झाली होती. मात्र, गोवा हे कोविडमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी उदघाटन सोहळ्यात केली होती. त्याचाही परिणाम म्हणून प्रतिनिधींच्या संख्येत वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com