Floating Jetty: शापोरा नदीचे पाणी पेटणार!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

शिवोलीवासीयांनी पुन्हा थोपटले दंड : तरंगती जेटीप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक

मोरजी: शिवोली (Siolim) पुलाखाली नांगरून ठेवलेली 11 कोटींची तरंगती जेटी (Jetty) चोपडे येथे स्थलांतरित करण्याच्या नदी परिवहन खात्याच्या प्रयत्नांना चोपडेतील (Chopdem) नागरिकांनी ‘ब्रेक’ लावला. त्‍यानंतर आता ती जेटी कुठे न्यावी? अशा विवंचनेत असलेल्या नदी परिवहन खात्याला शिवोलीतील नागरिकांनी निर्वाणीचा इशारा दिला. येत्या एक दोन दिवसांत या जेटीचे स्थलांतर न झाल्यास शिवोलीवासीय आक्रमक होतील, असा इशारा दिला आहे. त्‍यामुळे त्या तरंगत्या जेटीमुळे शापोरा नदीचे पाणी आणखी पेटणार आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Citizens are outraged over the issue of jetties on the chapora River in goa)

यासंदर्भात पुढील कृती ठरवण्यासाठी शिवोलीतील मार्ना व ओशेल पंचायत सदस्य, शिवोलीतील समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या जेटीचे कंत्रादार कॉस्मा डिसिल्‍वा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून जाब विचारला. एक - दोन दिवसांत शिवोलीतील जेटी इतरत्र स्थलांतरित करण्याचे आश्वासनांचे काय झाले? असे विचारले असता श्री. डिसिल्‍वा यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

IVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल

चोपडे येथील जेटी स्थलांतरित करणे स्थगित झाल्याने विलंब होत असल्याचे सांगत, आपण कंत्राटदार कंपनीचा प्रतिनिधी आहे. हा प्रश्न तुम्ही नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारा, असे सांगून त्‍यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेटी ज्या ठिकाणी नांगरून ठेवली आहे, त्या जागेवर नदी परिवहन खात्याचा अधिकार आहे. पंचायत आम्हाला विचारू शकत नाही? अशा शब्दांत त्यांनी ग्रामस्‍थांना फटकारले. त्यामुळे  संतापलेल्या शिवोलीतील आंदोलनकर्त्या नागरिकांनी श्री. डिसिल्‍वा यांना बरेच फैलावर घेतले. पुढील दोन दिवसांत जेटी स्थलांतरित न झाल्यास शिवोलीवासीय आंदोलन तीव्र करतील, असा इशारा दिला.

दरम्‍यान, मंत्री मायकल लोबो यांना शिवोली, शापोरा, मोरजी, पार्से, चोपडेतील नागरिकांनी शिवोलीतील तरंगत्‍या जेटीविरोधात संयुक्त निवेदन दिले.

संबंधित बातम्या