डिचोलातील धोकादायक पुलाची दुरूस्ती करण्याची आमदारांकडे मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

मये मतदार संघ व हळदोणा मतदार संघ तसेच बार्देश व डिचोली तालुक्यांना जोडणारे धोकादायक झालेल्या लोखंडी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सिकेरी व खोर्जुवे येथील नागरिकांनी मये मतदार संघाचे आमदार प्रविण झाटये व हळदोणा मतदार संघाचे आमदार ग्लेन टिकलोकडे मये येथील कमलाकांत तारी यांनी केलेली आहे.

डिचोलीः मये मतदार संघ व हळदोणा मतदार संघ तसेच बार्देश व डिचोली तालुक्यांना जोडणारे धोकादायक झालेल्या लोखंडी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सिकेरी व खोर्जुवे येथील नागरिकांनी मये मतदार संघाचे आमदार प्रविण झाटये व हळदोणा मतदार संघाचे आमदार ग्लेन टिकलोकडे मये येथील कमलाकांत तारी यांनी केलेली आहे. हा लोखंडी पुला गेल्या दोन वर्षांपासून  बंद करण्यात आला आहे, पण दुरुस्तीचे काम असुन सुरु करण्यात आलेले नाही.

 हा पुल मये व  हळदोणा, बार्देश व डिचोली तालुक्यांना जोडणारा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या पुलाची दुरूस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

-  संदीप देसाई 

अधिक वाचा : 

विश्रांतीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी गोव्‍यात

गोव्यात आजपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू

गोव्यातील मिरामार समुद्र किनाऱ्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन न करता छठ पुजा साजरी

 

संबंधित बातम्या