'गोव्याच्या जनतेचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुकुमशाह होऊ नये'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

गोव्यातील आंदोलकांना  सरकारने अडवू नये तसेच लोकांचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हुकुमशाही मार्गाचा वापर करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

मडगाव :  डॉ. राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीनेच गोव्याची ४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता झाली. आज गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी गोव्याची अस्मिता राखण्यासाठी पुढे येणाऱ्या गोमंतकीयांना लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलने करण्यास देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या आंदोलकांना  सरकारने अडवू नये तसेच लोकांचा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हुकुमशाही मार्गाचा वापर करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

आरोशी येथे मध्यरात्री जागरण आंदोलन करणाऱ्यांवर तसेच पणजी येथे विद्यार्थी व आंदोलक यांच्यावर पोलिसांकडून झालेली दंडेलशाही व काही जणांना केलेली अटक यावर प्रतिक्रिया देताना दिगंबर कामत यांनी सरकारकडे वरील मागणी केली आहे. आज प्रत्येक गोमंतकीयाला शांततापूर्ण पद्धतीने गोव्याच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचा निषेध करण्याचा व गोव्याची अस्मिता राखण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर काल पोलिसांकडून झालेल्या जबरदस्तीचा मी निषेध करतो, असेही त्यांनी सांगितलं. गोवा मुक्तीपूर्वी तसेच मुक्तीनंतर गोव्यात अनेक आंदोलने झाली. या सर्व आंदोलनांतून गोव्याची अस्मिता, ओळख तसेच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीचा लढा होता व तो यशस्वी झाला, असे दिगंबर कामत म्हणाले.

 

अधिक वाचा :

गोव्यात गर्भनिरोधकांच्या वापरात वाढ ; विविध माध्यमांद्वारे झालेल्या जनजागृतीचा परिणाम

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव उद्या गोव्या 

संबंधित बातम्या