गोमंतकीयांना अनुदानित दरात पेट्रोल दिले जावे  : प्रतिमा कुतिन्हो    

pratima kuntinho.jpg
pratima kuntinho.jpg

सासष्टी :  कोरोनावर (CoronaVirus)  नियंत्रण  आणण्यास गोवा सरकार (Goa Government)  पूर्णपणे असफल झाले असून कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.  एकीकडे कोरोनाची महामारी दुसरीकडे वाढती महागाईमुळे गोमंतकीय (Citizens of Goa)  आर्थिक संकटात सापडला आहे.  राज्यात दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असून सामान्य नागरिकांना याचा फटका बसत  आहे. (Citizens of Goa should be given petrol at subsidized rates: Pratima Kutinho) 

गोमंतकीयांच्या भल्यासाठी सरकारने पेट्रोलच्या दरातून व्हॅट हटवून अनुदानित दरात पेट्रोल द्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.  गोवा सरकारने कोरोनाची स्थिती नियंत्रणास आणण्यासाठी योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे आज सामान्य नागरिकांना याचा फटका बसत असून  कोरोनामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गोमंतकीयांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलच्या दरात वाढ करून सरकार जनतेला आर्थिकदृष्ट्या संकटात टाकत आहे. 

गोव्यात आज पेट्रोलचे दर ९१ रुपयांवर पोहचले असून सरकारने गोमंतकीय नागरिकांना भल्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट हटवून ५० रुपये अनुदानित दरात पेट्रोल देणे आवश्यक आहे, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.  सरकारकडून गृह आधार ही योजना सध्या सुरळीतपणे सुरू नसून सरकारने यावर लक्ष केंद्रित गृह आधार योजनेची निधी महिलांना वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com