गुजरात, मुंबई-दिल्लीकरांना आवडे 'गोवा'..

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

राज्यात सध्या दिल्ली, गुजरात आणि मुंबईतील धनदांडगे पर्यटनाच्या नावे दाखल झाले आहेत. अनेकजण स्वतःची वाहने घेऊन कुटुंबासह गोव्यात पर्यटन करीत आहेत. परंतु पर्यटनाबरोबरच हे लोक गोव्यातच मालमत्ता खरेदीसाठी उत्सुक असल्याचे एका मालमत्ता विक्री करणाऱ्या दलालाने सांगितले.

पणजी : राज्यात सध्या दिल्ली, गुजरात आणि मुंबईतील धनदांडगे पर्यटनाच्या नावे दाखल झाले आहेत. अनेकजण स्वतःची वाहने घेऊन कुटुंबासह गोव्यात पर्यटन करीत आहेत. परंतु पर्यटनाबरोबरच हे लोक गोव्यातच मालमत्ता खरेदीसाठी उत्सुक असल्याचे एका मालमत्ता विक्री करणाऱ्या दलालाने सांगितले. त्यावरून राज्यात ‘सेकंड होम'' साठीची या पर्यटकांची मोठी पसंती असावी, असेच यावरून स्पष्ट होत आहे. 

कोरोनाकाळात बॉलिवडूचे अनेक कलाकार गोव्यात सुरक्षिततेच्या कारणावरून येऊन राहिले होते. अनके अभिनेते-अभिनेत्यांनी गोव्यात ‘सेकंड होम'' म्हणून मालमत्ता खरेदी केली आहे. याशिवाय सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधीही सुरक्षितता म्हणून गोव्यात दाखल झाले आहेत. अशा अनेक वृत्तामुळे गोव्याची प्रतिमा कोरोनाच्या काळात ‘सुरक्षित गोवा’ अशी झाली आहे. पर्यटनाच्या नावाखाली सध्या दिल्ली, गुजरात आणि मुंबईतील धनदांडगे स्वतःची वाहने घेऊन गोव्यात आल्याचे नजरेस पडत आहेत. 

का वाढला कल?
दिल्लीत थंडीमुळे दिल्लीतील रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे अशीच स्थिती गुजरातमधीलही आहे. मुंबईतील स्थिती अजूनही स्थिर झालेली नाही. गोव्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे, त्याशिवाय कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही ९५ टक्क्यांवर आहे. मृत्यूंच्या संख्येतही घट होत असल्याने गोवा हा सुरक्षित वाटत आहे, त्यातूनच अशा पैसेवाल्या लोकांचा राज्यात मालमत्ता खरेदीचा विचार असावा, असे प्रथमदर्शनी दिसते.

अधिक वाचा : 

मयडेत लवकरच कचऱ्यापासून खतनिर्मिती

लिलाव प्रक्रियेमुळे गोव्यातील फेणी विक्रेते नाराज

विद्यार्थ्यांच्या पाऊलांनी दुमदुला फोंडा तालुक्‍यातील शाळेचा परिसर 

संबंधित बातम्या