Goa: आपत्तीकाळात ‘कातनेर’ गेले कोठे?    

cyclone impact on goa road.jpg
cyclone impact on goa road.jpg

काणकोण: सार्वजनिक बांधकाम खात्यात (PWD) कायमस्वरूपी असलेले कामगार (Worker) म्हणजे ‘कातनेर’. पोर्तुगीज काळात या कामगारांना ‘कातनेर’ (Katner) अशी ओळख प्राप्त झाली ती मुक्तीनंतर कायम राहिली. रस्त्याची गटारे उपसणे, रस्त्याच्या कडेची झुडपे कापून रस्ता मोकळा करण्याचे काम कातनेर करीत होते. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक सुपरवायझर असतो. मात्र, ‘कातनेर’ आपत्तीकाळात कुठे असतात हा सर्वसामान्यांना आता प्रश्न पडू लागला आहे. (Citizens of Kankon are asking where the pwd workers are during the disaster)

तौक्ते वादळात (Cyclone Tauktae) मडगाव - कारवार हमरस्त्यावर व अंतर्गत भागात अनेक झाडे पडली. मात्र, कुठेच झाडे कापून रस्ता वाहतुकीस मोकळा करताना ‘कातनेरां’चे अस्तित्व दिसले नाही. त्यामुळे आपत्ती काळात हे ‘कातनेर’ कुठे असतात हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला असल्याचे लोलयेचे माजी सरपंच व विद्यमान पंच अजय लोलयेकर यांनी सांगितले.

काणकोणात ‘कातनेर’ आहेत. मात्र, त्यांचे अस्तित्व दिसत नाही. वादळाच्या पडझडीत संपूर्ण लोलये पंचायत क्षेत्रात रस्त्यावर, घरांवर व वीज तारांवर पडलेली झाडे स्थानिक युवक पंच यांनी दिवसरात्र राबून कापून काढली. मात्र, त्यांच्या मदतीला हे ‘कातनेर’ कोणत्याच पंचायत क्षेत्रात गेले नाहीत याची चौकशी करण्याची मागणी लोलयेकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com