लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी धरली गोव्याची वाट

Citizens of Maharashtra waited for Goa due to lockdown
Citizens of Maharashtra waited for Goa due to lockdown

ओरोस (सिंदुदर्ग): राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र पूर्ण लॉकडाऊनला जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध असला तरी विकेंड लॉकडाऊनला मात्र नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी आपल्या घरात बसूनच आपली जबाबदारी पार पाडली आहे. यामुळे जिल्ह्यामधील रस्ते सुनसान होते. बाजारपेठा ओस पडल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकांनी विकेंडसाठी गोव्याची वाट धरली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र सुरुवातीला नागरिकांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन जिल्ह्यात यशस्वी होईल का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. गुढीपाडवा सन अगदी तोंडावर आला आहे. गुडीपाढव्याचा सन हा शुभ मानला जातो. यानिमित्त नव्य़ा खरेदीबरोबर नव्या व्यवसायाची सुरुवात केली जाते. त्यामुळे लॉकडाऊनला नागरिकांचा तीव्र विरोध होता. पालकमंत्री उदय सामंत नागरिकांना वांरवार आवाहन करत होते आठवड्याभरासाठी नियम पाळा. नंतर यामधून सवलत मिळवण्यासाठी प्रयत्न करु. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी नागरिकांना शासन आदेश पाळा, असं आवाहन केलं होतं. (Citizens of Maharashtra waited for Goa due to lockdown)

शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु झाला असून शनिवारी दिवसभरामध्ये नागरिकांची काय भूमिका राहते याकडे शासनाचे लक्ष होते. लॉकडाऊनमध्ये केवळ वैद्यकीय सेवा वगळता अन्य शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने बंद राहणार आहेत. नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अनेक नागरिकांनी विकेंडसाठी गोवा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असला तरी शेजारच्या गोवा राज्यामध्ये लॉकडाऊन नाही. त्यामुळे अनेकांनी घरी राहण्यापेक्षा गोव्यात जाण्याचा पर्याय निवडला आहे. कुटुंब किंवा ग्रुप करुन लोकांनी काल सायंकाळी किंवा आज सकाळी लोकांनी गोव्याची वाट धरली आहे.  
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com