Goa: नावेलीत गुंडगिरीविरुद्ध नागरिकांनीच थोपटले दंड

navelim.jpg
navelim.jpg

फातोर्डा: नावेलीत (Navelim) काही समाजकंटकांची गुंडगिरी (Bullying) वाढलेली आहे. शिवाय या भागात इतर समाजविरोधी कृत्‍यांत वाढ झाली आहे. हल्लीच एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याचा निषेध करण्यासाठी नावेली येथील शेकडो नागरिक आज एकत्र आले व त्यांनी या गुंडगिरीचा बिमोड करण्याची शपथ घेतली. (Citizens of Naveli took initiative to oppose bullying)

स्थानिक नेते जॉर्ज बार्रेटो यांनी सांगितले की, या गुंडगिरीविरुद्ध सर्व गोमंतकीयांनी एकत्र आले पाहिजे. कुणालाही न भिता त्याला विरोध केला पाहिजे. ही जबाबदारी युवकांची आहे. आज केवळ नावेलीकर एकत्र होतील, असे दिसत होते. पण, येथे वार्का, चिंचोणे, बाणावली, चांदर, कुंकळ्ळी येथील नागरिकही सहभागी झाले. हा गोमंतकीयांचा एकवट यापुढे असाच राहील, असे बार्रेटो म्हणाले.

ज्या गुंडाने तरुणावर हल्ला केला त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयानेही त्याला जामीन मंजूर केला नाही. त्यासाठी त्यांनी पोलिस व न्यायालयाचे आभार मानले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादुन पोलिसांना अधिकार देण्याच्या निर्णयाचेही या सभेत स्वागत करण्यात आले.

गुंडगिरीविरुद्ध जे आंदोलन आम्ही सुरू केले आहे, त्यात कोणतेही राजकारण आणले जाणार नाही किंवा राजकारण्याला त्यात ढवळाढवळ करण्याची संधी देण्यात येणार नाही, असे आलेक्स यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com