पणजीकरांनी अनुभवली तेरा वर्षांतील तिसरी सर्वात थंड रात्र

बुधवारची रात्र ही पणजीतील मागच्या तेरा वर्षांतील तिसरी सर्वात थंड रात्र होती.
Low Temperature
Low Temperature Dainik Gomantak

पणजी: बुधवारची रात्र ही पणजीतील मागच्या तेरा वर्षांतील तिसरी सर्वात थंड रात्र होती. यावेळी किमान तापमान 17.6 डिग्री सेल्सिअस होते. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा दोन डिग्री कमी होते. बुधवारी दिवसा सुद्धा शहरात थंड वातावरण होते. दिवसाचे तापमान (Temperature) 29.4 डिग्री नोंदवले गेले. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 3.2 डिग्री कमी होते. (Panaji Goa Weather Update)

Low Temperature
'रखडलेला कुठ्ठाळी कला भवन प्रकल्प लवकरच पूर्णत्वास'

पणजीमध्ये (Panaji) 2008 च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) 15.8 डिग्री सेल्सिअस तापमान होते, तर 2019 च्या प्रजासत्ताक दिनादिवशीचे तापमान 17.7 डिग्री सेल्सियस होते. यापेक्षा कमी तापमान 3 जानेवारी 1991 मध्ये पणजीत नोंदवले गेले. हे तापमान 14.4 डिग्री सेल्सिअस होते.

Low Temperature
Goa Election: गोव्यात आम आदमी पार्टीच भाजपला पर्याय ठरणार

जानेवारी 12 ला पणजीचे तापमान 17.2 डिग्री सेल्सिअस होते. हे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. हवामान खात्याने किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजाप्रमणे तापमान अनुक्रमे 19 डिग्री सेल्सिअस आणि 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. मागील काही दिवासात शहरात सकाळी धुके (Fog) पडत आहे. पणजीतील लोकांना सध्या थंडीमध्ये उठून कामाला जावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com