तुये नागरिकांनी वीज आणि पाण्याच्या समस्या मांडल्या अधिकाऱ्यांकडे!

तुये नागरिकांनी स्वयंपूर्ण मित्र आणि संबधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वीज आणि पाण्याच्या समस्या मांडल्या.
तुये नागरिकांनी वीज आणि पाण्याच्या समस्या मांडल्या अधिकाऱ्यांकडे!
ProblemDainik Gomantak

तुये पंचायत क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात वीज आणि पाण्याची गंभीर समस्या (Problem) असून त्यावर त्वरिततोडगा काढावा, या 17 दिवसात किमान चार पाच वेळा वीज गुल झाली तर 7 दिवस वीज खंडित झाली नाही, अशी समस्या संदीप कलंगुटकर आणि उपस्थित नागरिकांनी स्वयंपूर्ण मित्र आणि संबधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांडल्या.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सरकार तुमच्या दारी योजनेंतर्गत प्रत्येक पंचायतीसाठी एका अधिकाऱ्यांची निवड केली आहे, हे अधिकारी प्रत्येक शनिवारी नागरिकांच्या समस्या प्रश्न ऐकून ते सरकारी दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असातत. त्याचाच एक भाग म्हणून तुये पंचायत क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी 13 रोजी अधिकार विलास ताम्बोसाकार उपस्थित होते, शिवाय

Problem
पेडणे तालुक्यासाठी रवींद्र भवनसाठी जागा निश्चित; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

पाणी विभागाचे अधिकारी संदीप मोरजकर, वीज अधिकारी सरपंच सुहास नाईक, उपसरपंच कविता हरिजन, पंच निलेश कांदोळकर, पंच आनंद साळगावकर, आदी उपस्थित होते.

नागरिक संदीप कलंगुटकर यांनी तीव्रतेने आपल्या भागात विजेची कश्या पद्धतीची समस्या आहे आणि कधी कधी किती वेळेला वीज गायब होते त्याची कागदावर लेखी वेळ आणि तारखेसहित अधिकाऱ्यासमोर मांडली. शिवाय पाण्यासाठी कसे हाल होतात मागची पंधरा वर्षे नागरिकांनी सहनशीलता ठेवली आहे आता रस्त्यावर य्रवून किंवा पाणी विभागावर मोर्चा नेल्यावर एकाही कार्यालयीन साहित्याची नागरिकांकडून मोड तोड झाली तर त्याला जबाबदार हा पूर्णपणे सरकार असणार असल्याचे सांगितले.

पाणी तुये गावाला वेळेवर उपलब्ध होत नाही, गावासाठी पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे मात्र त्या विहिरीचे झाकण लोखंडी उघडे आहेत, त्याला गंज आली ती पाण्यात पडते शिवाय झाडांचा पाचोळा पाण्यात पडतो, गाळ उपसला नाही, त्यामुळे या पाण्यामुळे रोगराई होवू शकतात अश्या तक्रारी नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यासमोर मांडल्या.

उदय मांद्रेकर यांनी बोलताना पाण्याची समस्या गंभीर असतानाच सरकार काहीच उपाय योजना करत नाही, ठराविक सरकारच्या समर्थकाना पाण्याचे टेंकर पुरवठा केला जातो, हल्लीच आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते गावकरवाडा तुये येथे पाण्याची टाकी उभारलेली आहे ती केवळ त्याच परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी का असा सवाल मांद्रेकर यांनी उपस्थित केला असता, हि टाकी सर्वासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी असणार असे उत्तर पाणी विभागाचे अधिकारी संदीप मोरजकर यांनी दिले.

Problem
नोकऱ्या देण्यासाठी बाबूंना आणखी पाच वर्षे कशाला?

संदीप कलंगुटकर यांनी जोपर्यंत तुये मुरमुसे गावात पाणी नियमित पाणी पुरवठा होत नाही तो पर्यंत या जलवाहिनीतून कोरगाव भागाला पुरवठा करू नये. पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी पाण्याची समस्या स्वयं मित्र विलास तामाबोस्कर यांच्यासमोर मांडल्या.

माजी सरपंच निलेश कांदोळकर यांनी बोलताना पाण्याची समस्या सर्वत्र गंभीर असतानाच काही नागरिक आवाज उठवतात आणि मोर्चा नेण्याचा इशारा देतात त्याच वेळी स्थानिक आमदार उत्तर देताना मोर्चा नेवून पाणी समस्या सुटत नाही, त्यावर उपाय योजना करायला हवे असे ते म्हणतात तर मग त्यांनी आजपर्यंत साडेचार वर्षात का केले नाही असा सवाल उपस्थित केला, यावेळी पंच आनंद साळगावकर यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या.

सरपंच सुहास नाईक यांनी ज्या समस्या नागरिकांनी मांडल्या त्या स्वयंमित्राने सरकार दरबारी मांडून सोडवाव्यात अशी सुचना केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com