COVID-19 Goa: ''कोरोना लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करून रुग्णालयात दाखल व्हावे"

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

मुख्यमंत्री सावंत यांनी जिल्हा इस्पितळात भेट देऊन कोविड व्यवस्थापन तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला.

मडगाव: राज्यात 30 टक्के कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांना मृत अवस्थेत व शेवटच्या क्षणी इस्पितळात भरती करण्यात येत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून नागरिकांना कोविड-19 आजाराची कुठलही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित कोरोना चाचणी (Coronavirus) करून इस्पितळात उपचार करण्यासाठी दाखल होणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी मडगाव (Margao) येथे केले. दक्षिण गोवा जिल्हा सरकारी इस्पितळाला त्यांनी आज भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, गोमंतकीय नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून उपचारासाठी इस्पितळात भरती झाल्यास निश्चितच कोरोनामुळे वाढणारा मृत्यू दर कमी होऊ शकतो. मुख्यमंत्री सावंत यांनी जिल्हा इस्पितळात भेट देऊन कोविड व्यवस्थापन तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला.("Citizens should be tested immediately and hospitalized if corona symptoms are found")

गोव्यात(Goa) कोरोनामुळे(Covid-19) मरण(Death) पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तब्बल 75 व्यक्तींचा कोरोनामुळे गेला. गेल्या 11 दिवसात कोरोनाने 636 जणांचे प्राण घेतले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला असून काही ठिकाणी अपुऱ्या ऑक्सिजनमुळे नागरिकांना त्रासही सहन करावा लागत आहे.

दाभोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्रीची बंद

सध्याच्या घडीला ऑक्सिजन ही महत्वाची बाब झालेली असताना, काल मंगळवारी अचानक दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ऑक्सिजनच्या टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत एक कामगार  जखमी झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे सरकारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य खाते अपयशी ठरल्याचा आरोप करून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे खुद्द आरोग्यमंत्री संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत.  या सर्व गोंधळात कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडचणी येऊन कोरोना बळींची संख्या बेसुमार वाढत आहे.

 

संबंधित बातम्या