Margaon Municipality: स्वच्छतेसाठी नागरी आरोग्य केंद्र सक्रिय

मडगावात मोहीम : पालिकेचे सहकार्य; प्लास्टिक कचरा हटवण्यावर दिला भर
Goa: Margaon Municipal Council
Goa: Margaon Municipal CouncilDainik Gomantak

पावसाळ्यात होणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी मडगाव नागरी आरोग्य केंद्र नागरिकांना अनेक उपाय सुचवत असते. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात व रोगांची वाढ होते. मडगाव नागरी आरोग्य केंद्राने मडगाव नगरपालिकेच्या सहकार्याने आता नागरिकांवर विसंबून न राहता स्वत:च उपाय राबविण्याची मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेची माहिती मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे सीनियर फालेरिया निरीक्षक अँथनी बॉर्जिस यांनी दिली. त्यांच्यासमवेत स्वच्छता निरीक्षक दिवाकर गावस देसाई, जुझे नोरोन्हा हे इतर कर्मचारी व नगरपालिकेचे मजूर स्वत: मडगावच्या प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन गोळा करून ठेवलेले बिनकामाचे टायर, प्लास्टिक बादल्या-वस्तू, भांडी, रंगाचे रिकामे प्लास्टिक डबे तसेच ज्या वस्तूंमध्ये पाणी साचू शकते, अशा वस्तू गोळा करून नेतात व परिसर स्वच्छ ठेवतात.

Goa: Margaon Municipal Council
Smart Panaji: स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका, दिव्यांग व्यक्ती गाडीसह कलंडला खड्ड्यात

या प्रभागांत राबविणार मोहीम

यापूर्वी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या आके प्रभागामध्ये, सदानंद नाईक यांच्या घोगळ प्रभागामध्ये, पूजा नाईक यांच्या चंद्रवाडो प्रभागामध्ये ही मोहीम राबविली. उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांच्या कालकोंडे, कोलमोरोड तसेच महेश आमोणकर यांच्या शिरवडे, चिंचाळ, डॉ. रोनिता आजगावकर यांच्या गांधी मार्केट व सिने लता मागच्या भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Goa: Margaon Municipal Council
Goa Shigmotsav: शिगमोत्सवामुळे नवोदित कलाकारांना मिळते व्यासपीठ

हवामान खात्याने पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केल्याने मडगावात अशा प्रकारची मोहीम पहिल्यांदाच जलदगतीने सुरू आहे. ही मोहीम प्रत्येक प्रभागांमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व संबंधित नगरसेवक यांच्या परवानगीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये नगरसेवकही उपस्थित राहतात. ही मोहीम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केली होती.

- ॲँथनी बॉर्जिस, सीनियर फायलेरिया निरीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com