IIT Goa : आयआयटीचा विरोध हातघाईवर; वातावरण तंग

सर्व्हेक्षणावेळी पोलिस आणि महिला शेतकऱ्यांमध्ये झटापट
IIT Goa Protest in Sanguem
IIT Goa Protest in SanguemDainik Gomantak

IIT Goa : येथील प्रस्तावित आयआयटी विरोधात सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. काल सोमवारी दुपारी दीड वाजता कोठार्ली येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व्हे अधिकारी पोलिस बंदोबस्तात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी समजावूनही शेतकरी भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापट होऊन चार महिला शेतकरी जखमी झाल्या.

सांगे आयआयटी प्रकल्प साकार करण्यासाठी सर्व्हेक्षण अंतिम टप्यात पोहचले असून काल शेवटचे सहा पॉईंट मार्किंग करण्याचे शिल्लक होते. शेतकऱ्यांना ते पूर्ण करणार याची कल्पना असल्याने सुमारे शंभरेहून अधिक महिला वाट अडवून राहिल्या होत्या. तो अंदाज आल्याने पोलिस बळ वाढविण्यात आले होते. केपेचे उप अधीक्षक निलेश राणे यांच्या दिमतीला सांगेचे पोलीस निरीक्षक विनायक पाटील, केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, कुडचडेचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक आपला फोर्स घेऊन घटनास्थळी आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी या आयआयटी प्रकल्पाला विरोध करत आहेत. शनिवारी नागवे आणि रविवारी वरकटोतील शेतकऱ्यांनी शेतजमिनीत जाऊन सरकारचा निषेध नोंदविला होता.

IIT Goa Protest in Sanguem
Goa Mining : गोव्यातील खाणपट्टे लिलावाला केंद्राकडून प्राधान्य मिळणार

प्रक्रिया रोखण्यासाठी राष्ट्रगीताचा आधार

शेतकरी महिलांनी वाट अडवून प्रार्थना आणि राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांसहित सर्वानी शांतपणे राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर मात्र पोलिसांनी बळ वापरून वाट मोकळी करण्यास सुरुवात केली असता झटापटीत चार महिला खाली पडल्या. त्यांच्यावरून अनेक जण गेल्याने जखमी झालेल्या वयस्कर महिलांना सांगेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

कामात नाहक अडथळा

मामलेदार राजेश साखळकर आणि पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणताही सर्व्हे पॉईंट घालण्यात येत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कामात नाहक व्यत्यय निर्माण करू नये, असे अधिकारी वारंवार सांगत होते.

शेतकऱ्यांचा ठिय्या

धक्काबुक्की करून पोलिसांनी जखमी केल्याची फिर्याद दाखल करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावर पोलिसांनी घटनेची एन.सी. नोंद करणार असल्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत शेतकरी सांगे पोलिस स्थानकात ठाण मांडून होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com