खबरदारी घेऊन वर्ग सुरू करा: उद्धव ठाकरे

Classes 9th to 12th should be started in the state by taking proper precautions regarding the safety of students
Classes 9th to 12th should be started in the state by taking proper precautions regarding the safety of students

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. जागतिक परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतर पुढील काही दिवस अधिक दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे, असेही ते म्हणाले.
व्हििडओ कॉन्फन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते. 


‘‘ज्या शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते, ते बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागी सुरू करता येतील का, त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोरोना तपासणी आदी काळजी घेणे आवश्‍यक आहे. एखादा पाल्य आजारी असेल किंवा घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल, अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही 
मुख्यमंत्र्यांनी केले. 


टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्यात, तसेच त्या व्यवस्थित सुरू राहाव्यात म्हणून स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती राज्यमंत्री कडू यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर बोलताना अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा म्हणाल्या की, शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे सांगितले.


शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी १७  ते २२ नोव्हेंबरदरम्यान केली जाईल. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. एका बाकावर एकाच विद्यार्थ्यांला बसवण्यात येईल. एक दिवसआड वर्ग भरतील. विद्यार्थ्यांनी घरूनच जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणावी. शाळेचा कालावधी चार तासांचा असेल आणि त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह इतर विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 
दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com