कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे डिचोलीत बसस्थानकावर साफसफाई

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

डिचोली पंचक्रोशी कदंब कर्मचारी संघातर्फे रविवारी डिचोलीतील कदंब बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नेहमीच्या धावपळीच्या जीवनात सवड काढून कदंबचे कर्मचारी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत उतरले आणि या कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाची साफसफाई केली. 

 डिचोली : डिचोली पंचक्रोशी कदंब कर्मचारी संघातर्फे रविवारी डिचोलीतील कदंब बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नेहमीच्या धावपळीच्या जीवनात सवड काढून कदंबचे कर्मचारी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत उतरले आणि या कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाची साफसफाई केली. 

या उपक्रमातून या कर्मचाऱ्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला. या अभियानात डिचोली पंचक्रोशी कदंब कर्मचारी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, कृष्णा मयेकर, प्रदिप पत्रे, धनंजय मोने, सदा परवार, रामा साळगावकर, काशिनाथ फळारी, निलेश काजारी, आनंद गावकर, गोविंद गाड्‌डी, नंदू मोरजकर, सुभाष मालवणकर, अशोक न्हावेलकर, देविदास नानोडकर, राजेंद्र चोपडेकर, नंदकिशोर प्रभू, हरिश्‍चंद्र कवळेकर, रवींद्र रेडकर, उदय नागवेकर आदी कदंब वाहतूक महामंडळाचे चालक आणि वाहक कर्म्‌चारी सहभागी झाले होते.

 या कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावरील प्लास्टीक आदी कचऱ्याची उचल करुन साफसफाई केली. कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत
 आहे.

संबंधित बातम्या