
वास्को येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी सुरू केलेला स्वच्छ परिसर उपक्रमाला युवकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक रविवारी शंकर पोळजीसह युवक-युवती स्वच्छतेसाठी एकत्र येत आहेत. रविवारी त्यांनी श्यामचे भाट खालील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता केली. समुद्र किनाऱ्यावर जाऊन स्वच्छता करणाऱ्या या युवक-युवतींचे कौतुक केले जात आहेत.
समुद्र किनारे, सार्वजनिक ठिकाणी काहीजण कचरा टाकतात. काहीजण मजा करण्यासाठी येतात आणि जाताना बियरच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, ग्लास वगैरे तेथेच टाकतात. समुद्र किनारे, सार्वजनिक ठिकाण ही कचरा करण्यासाठी असतात असा त्यांचा समज झालेला असतो. याप्रकरणी शंकर पोळजी पूर्वी आवाज उठवित होते. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने त्यांनीच तो कचरा उचलण्यास प्रारंभ केला. हळूहळू स्थानिक युवक-युवर्तीकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे त्यांचाही हरुप वाढला आहे.
रविवारी त्यांनी श्यामाचे भाटातून खाली उतरून समुद्र किनारी जमा झांलेला कचरा गोळा केला. मोठ्या प्रमाणात कचरा झालेला कचरा डोंगर माथ्यावर वाहून नेणे कठीण होते. परंतु त्या युवक-युवतींनी प्रयत्न व परिश्रम करून तो कचरा डोंगर माथ्यावर आणला. त्या कचऱ्याची जवळच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात आली.
पुढील रविवारी त्यांची धडक आणखी कोठेतरी असेल. त्यांचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने कचरा इकडेतिकडे न टाकता योग्य ठिकाणी टाकण्याची व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.