गोवा: राज्यात 8 एप्रिल नंतर तुरळक पावसाची शक्यता

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

राज्य हवामान वेधशाळेने येत्या काही दिवसांत राज्यातील हवामान बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पणजी: राज्य हवामान वेधशाळेने येत्या काही दिवसांत राज्यातील हवामान बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील वेगवगेळ्या ठिकाणी तुरळक  व्रवण्यात आली आहे. त्याच अनुशंघाने राज्यातील नागरिकांनी योग्य ते खबरदारी घेण्याची गरज असणार आहे. (Cloudiness to increase from 8th April over Goa)

पर्यटक टॅक्सीमालकांचे धरणे; गोवा माईल्‍स टॅक्‍सी सेवा रद्द करा

गोव्यातील हवामानमत येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल दिसून येणार असल्याच्या शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवला आहेत. राज्य हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोव्यामध्ये येत्या 8 एप्रिलपासून ढगाळ वातावरण वाढणार आहे. तसेच एप्रिलपासून राज्यातील वेगळ्या ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याच्या देखील शक्यता आहेत. विशेषतः वेधशाळेने वारवलेल्या या अंदाजानुसार राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Rainfall) पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आज गोव्यात (Goa) कमाल तापमान (Temperature) 32 डिग्री सेल्सियस असून किमान तापमान 27.5  डिग्री सेल्सियस पर्यंत असणार आहे. तर वातावरणातील आर्द्रता 89 टक्क्यांपर्यंत असणार आहे.  
 

संबंधित बातम्या