राज्यात ढगाळ वातावरण

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राज्यातून मान्सूनने काही दिवसांपूर्वीच माघार घेतली आहे. काही दिवसानंतर राज्यात आज परत ढगाळ स्वरूपाचे वातावरण अनुभवास आले. मात्र, पाऊस पडल्याची नोंद राज्यात कोठेच झालेली नाही.

 पणजी : राज्यातून मान्सूनने काही दिवसांपूर्वीच माघार घेतली आहे. काही दिवसानंतर राज्यात आज परत ढगाळ स्वरूपाचे वातावरण अनुभवास आले. मात्र, पाऊस पडल्याची नोंद राज्यात कोठेच झालेली नाही. सकाळच्या वेळी पाणथळ ठिकाणी धुके पडले होते आणि सकाळी दहानंतर चांगलेच कडाक्याचे उन्ह पडले होते. राज्यात गेल्या चोवीस तासात कमीत कमी २४.६ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती वेधशाळेने दिली. दरम्यान, १ रोजी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या