'प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने लेखन करावे'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

प्रसारमाध्यमे त्यांचे विचार व मते मांडण्यास स्वतंत्र आहेत मात्र ती माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

पणजी - पर्यावरण व पर्यटन या विषयांवर लेखन करताना प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने लिहावे. त्यातील चुकीच्या माहितीचा राज्य व पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीतील राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळ्यात व्यक्त केले.

गोवा हे देश व विदेशात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने जगभराचे लक्ष त्‍याकडे असते. या माहितीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मारक ठरू शकतो.

प्रसारमाध्यमे त्यांचे विचार व मते मांडण्यास स्वतंत्र आहेत मात्र ती माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीतील राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळ्यात बोलताना केले.

संबंधित बातम्या