Panjim Smart City : स्मार्ट शहरे लोकांचे जीवनमान उंचावण्याची सर्वात मोठी संधी : मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा आणि तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन
Smart Cities CEOs' Conference
Smart Cities CEOs' ConferenceDainik Gomantak

Panjim Smart City : पणजीत स्मार्ट सिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या डेटा आणि तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या 2 दिवसीय परिषदेला देशभरातील 100 हून अधिक स्मार्ट शहरांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्मार्ट शहरे ही केवळ स्वप्ने किंवा सैद्धांतिक संकल्पना नसून लोकांचे जीवनमान उंचावण्याची सर्वात मोठी संधी आहे असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Smart Cities CEOs' Conference
IIT Goa : आयआयटी दक्षिण गोव्यातच होणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) समन्वयाने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पणजीतील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, इलेक्ट्रिक बसेस, मांडवी प्रोमेनेड यांसारख्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महसूल निर्मितीला मोठा वाव आहे तसेच या प्रकल्पांच्याद्वारे होणारी कमाई शहरासाठी अतिरिक्त महसूल मिळवून देऊ शकते असे आयपीएससीडीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मामू हागे यांनी सांगितले.

Smart Cities CEOs' Conference
Pariksha Pe Charcha 2023: परीक्षेला उत्सव समजून सामाेरे जा! मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जून 2015 रोजी  स्मार्ट सिटी अभियान  सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटीज अभियाना अंतर्गत विशेष प्रकल्पांची अंमलबजावणी आयपीएससीडीएलसह जीएसआयडीसी, जीएसयुडीए, पीडब्ल्यूडी ,डब्ल्यूआरडी यासारख्या अनेक राज्य संबंधित संस्था करतात. सरकारने यासाठी 239.80 रु कोटींचा निधी जारी केला आहे. त्यापैकी 181.56 रु. कोटींचा वापर करण्यात आला आहे.

Smart Cities CEOs' Conference
Panjim Smart City : 'पणजीत अजून किती दिवस सुरू राहणार काम? 'स्मार्ट सिटी'बाबत महापौर म्हणाले...

आयपीएससीडीएल संस्थेअंतर्गत सर्व प्रकल्पांचे परीक्षण केले जाते आणि निधी दिला जातो. स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत पणजी शहरात रु. 950.34 कोटी खर्चाचे  47 प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकी रु. 58.15 कोटी खर्चाचे 15 प्रकल्प पूर्ण झाले आहे.

सध्या, रु. 892.19 कोटी खर्चाचे  32 प्रकल्प सुरु आहेत, त्यापैकी रु. 303.42 कोटी खर्चाच्या 7 प्रकल्पांनी 90% आणि रु. 131.56 कोटी खर्चाच्या अतिरिक्त 12 प्रकल्पांची 50% प्रगती झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com