Mahadayi Water Dispute : म्हादई जल प्राधिकरण 'पणजी'त

गोव्याचे हित जपणे हे माझे काम आहे : मुख्यमंत्री डॉ. सावंत
CM pramod Sawant On Mahadayi
CM pramod Sawant On Mahadayi Dainik Gomantak

Mahadayi Water Dispute : म्हादई प्रवास या संकल्पनेतून पणजीत म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

विरोधकांचे काम टिका करणे आहे. गोव्याचे हित जपणे हे माझे काम आहे आणि ते मी करीत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

CM pramod Sawant On Mahadayi
Anmod Ghat : कर्नाटकातून बेळगावमार्गे गोव्याकडे येणारी अवजड वाहने जप्त

मुख्यमंत्री म्हणाले, "म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्याची आमची नेहमीच मागणी होती. केंद्र सरकारने म्हादई प्रवास या संकल्पनेतून म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यास सहमती दर्शवल्याने पंतप्रधान व जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांचे आभार मानतो."

"कर्नाटकने कणकुंबीवर जो बंधारा घातला होता त्यातून थोडे पाणी वळविले जात होते. म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाने जो निर्णय दिला होता तो नियंत्रीत करण्यासाठी हे प्राधिकरण कार्य करेल याची मला खात्री आहे."

"विरोधकांचे काम टिका करणे आहे. गोव्याचे हित जपणे हे माझे काम आहे आणि ते मी करीत आहे. म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाने जेवढे पाणी कर्नाटकला दिले आहे ते कोणीच अडवू शकत नाही." असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM pramod Sawant On Mahadayi
Goa : कृत्रिम हातांना मेंदूचे बळ; 25 दिव्यांगांना मिळणार अत्याधुनिक हात

याबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘म्हादई प्रवाह’च्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याचे आणि निर्णयांचे पालन, अंमलबजावणी करणे शक्य होईल.

तसेच गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत परस्पर विश्‍वास आणि समजूतदारपणा निर्माण करण्यासदेखील मदत होईल. केंद्राच्या निर्णयामुळे तिन्ही राज्यांतील सर्वांगीण विकासासाठी जलस्रोतांचा योग्य वापर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com