Goa : मुख्यमंत्र्यानो हात जोडतो; पण आमचे प्रश्न सोडवा

Goa : मुख्यमंत्र्यानो हात जोडतो; पण आमचे प्रश्न सोडवा
The CM joins hands; But solve our problems

मोरजी : सरकार बलाढ्य व्यावसायिकांचे कर्ज माफ करतात, आमचा व्यवसाय हातावरचा, याच व्यवसायावर आमचे पोट अवलंबून आहे. कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर टॅक्सी (Taxi) व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यवसाय नसल्याने गाड्यांचे हप्ते बँकला भरता येत नाही, बँक (Bank) वाहने ओढून नेतात, अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की, आमच्या एक एक वाहनाचे सरकारने कर्ज माफ करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे.

राज्यात माईल्‍स ॲप विरोधात राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या गाड्या घरी पार्क करून आंदोलन करत आहेत. आमचा एकमेव व्यवसाय गोमंतकीयांच्‍या हातात आहे, तोच व्यवसाय आता काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे.मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे - मांद्रे, हरमल आणि केरी तेरेखोल या किनारी भागाचा विचार केला, तर किमान या व्यवसायात साडेसातशे पेक्षा जास्त टॅक्सी व्यावसायिक केवळ मालकच गुंतलेले आहेत. किनारी भागात चार महिने पर्यटन हंगामात धंदा होतो, मात्र शहरात वर्षाचे बाराही महिने व्यवसाय असतो. मात्र, किनारी भागात तशी परिस्थिती नसते आणि चार महिन्याच्या व्यवसायातून सुद्धा टॅक्सी व्‍यावसायिक बँकचे व्यवस्थित हप्ते भरत असे. आता कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने बँकचे हप्पे भरता येत नाही, बँक व्याज दिवसेंदिवस वाढत आहे. बँक वसुली अधिकाऱ्यांच्या ससेमिरा आता व्यावसायिकांच्या मागे लागलेला असतो. त्यापेक्षा सरकारने किमान एका वाहनाचे बँक कर्ज माफ करावे अशी मागणी व्यावसायीक करत आहे.

फ्रेंड्स टॅक्सी संघटना
राज्यात चाललेले आंदोलन गावागावात पोचावे यासाठी मागच्या दीड महिन्यापूर्वी मांद्रेचे युवा वकील प्रसाद शहापूरकर यांनी एका दिवसाचे धरणे १८ एप्रिल रोजी चोपडे येथे आयोजित केले होते. त्यावेळी शेकडो राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी पाठींबा दिला होता. त्यानंतर पेडणे तालुक्यात जनजागृती आणि हे आंदोलन गावागावात पोचवण्यासाठी फ्रेंड्स टॅक्सी संघटना कार्यरत केली. गोवा माईल्स ॲप रद्द करा म्हणून ग्रामसभेला पत्र देणार असल्याचे वकील प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com