मुख्यमंत्र्यांचा आठवड्यातून दोन दिवस ‘जनता दरबार'

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोविड महामारीचा प्रभाव आटोपत असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला भेटणे सुरू केले आहे. सध्या शनिवारी व रविवारी मुख्यमंत्री साखळी येथील रवींद्र भवनात ते दिवसभर जनतेला भेटत असतात.

पणजी : कोविड महामारीचा प्रभाव आटोपत असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला भेटणे सुरू केले आहे. सध्या शनिवारी व रविवारी मुख्यमंत्री साखळी येथील रवींद्र भवनात ते दिवसभर जनतेला भेटत असतात.

मुख्यमंत्री याबाबत म्हणाले, पूर्वी वेळ घेऊन कोणी भेटायला येणार असतील, तर पणजीतील शासकीय निवासस्थानी व पर्वरीतील कार्यालयातही मी जनतेला भेटतो. काहीजण निवेदने देण्यासाठी येण्यासाठी वेळ मागतात तीही मी देतो. चर्चेसाठी माझी दारे उघडी आहेत, असे मी अनेकदा सांगितले आहे. आंदोलने करून उगाच शक्ती वाया घालवण्यापेक्षा सरकारशी मुद्देसूद चर्चा केली पाहिजे. काही जणांना पूर्वी वेळ घेऊन भेटायचे नसते, पण त्यांना मला भेटायचेही असते. अशा व्यक्तींसाठी शनिवारी व रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात मी उपलब्ध असतो.

काहींची कामे सरकारी कार्यालयात रेंगाळलेली असतात तर काही जणांना कोणत्या तरी प्रकरणात सरकारने मदत करावी असे वाटते. सर्वांची कामे होतील असे मी पाहतो. त्यांनी दिलेले निवेदन संबंधित खातेप्रमुखाला पाठवले जाते. त्यावर खुलासा मागितला जातो. गरज असल्यास अर्जदारांस माझ्या कार्यालयातून दूरध्वनीवर पाठपुरावा सांगितला जातो, अनेकदा माझ्या कार्यालयातून खात्यात पत्र पोचताच ते काम होते त्यामुळे अर्जदाराला तसे कळवावेही लागत नाही असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या