मुख्यमंत्री सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

महामारीवर मात करून आपण सारे पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे. दिपावली सर्वांच्या आयुष्यात समाधान, ऐश्वर्य, शांती, चांगले आरोग्य घेऊन येवो या सदिच्छा व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी   दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

पणजी-  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाकाळात उत्सव साजरा करत असलो तरी परिस्थिती सुधारत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्य़क्त केले. महामारीवर मात करून आपण सारे पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे. दिपावली सर्वांच्या आयुष्यात समाधान, ऐश्वर्य, शांती, चांगले आरोग्य घेऊन येवो या सदिच्छा व्यक्त करत त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही दिपावलीच्या शुभेच्छा देताना हा धर्म, जात बाजूला सारून देशात मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. सत्य, ज्ञान, नम्रता आणि मानवाची सेवा करण्याच्या सकारात्मक शक्तिने आपल्या मनाला प्रकाशित करून हा उत्सव  साजरा करूया, अशी भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  

संबंधित बातम्या