गोव्याच्या हितासाठी पत्रकारिता करा; CM नी पत्रकारांना दिली आनंदाची बातमी

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ
Patrakar Bhawan
Patrakar BhawanDainik Gomantak

राज्यातील पत्रकारांना आनंदाची बातमी देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील पत्रकारांनी आपली पत्रकारिता गोव्याच्या हितासाठी करावी असे म्हटले आहे. राजधानी पणजी येथे आंतरराष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पत्रकार बांधवांना आंतरराष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या.

(CM Pramod Sawant announced Patrakar Bhawan will be constructed at Patto Panaji)

Patrakar Bhawan
Goa Enironment: काणकोणात मासळी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्‍यांचा वापर

आंतरराष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आज पणजी येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी येथील पाटो येथे येत्या 4 वर्षात पत्रकार भवन उभारणार असल्याची घोषणा केली आहे. या इमारतीमुळे पत्रकार बांधवांना नव नव्या संकल्पना अवलंबण्यास मदत होईल असे ते म्हणाले. तसेच 30 वर्षांत पत्रकारिता बदलली आहे. त्यानुसार आपण ही बदल स्विकारत असाल तर उत्कर्ष साधण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Patrakar Bhawan
Marathi Science Council Goa: 19 तारखेपासून गोव्यात मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे अधिवेशन

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो महत्त्वाचा आहे. राज्यातील पत्रकारांनी गोवाच्या हितासाठी पत्रकारिता करावी असे आवाहन केले आहे. समाजात जाणारा संदेश काय जायला हवा आणि काय जातो आहे. यावर समाजाचे संतुलन असल्याने पत्रकारीता महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. तसेच राज्यात सुसज्ज असे पत्रकार भवन नसले तरी येत्या काही वर्षात ते उभारण्यात येणार असल्याने पत्रकार बांधवात समाधानाचे वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com