एनआयओच्‍या संशोधनाचा लाभ घ्या!

समुद्र दिनानिमित्त शेतकरी, उद्योजकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं आवाहन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी : आत्‍मनिर्भर भारत, स्‍वयंपूर्ण गोवाच्‍या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्‍यातील शेतकरी, उद्योजकांनी राष्ट्रीय समुद्र शिक्षण संस्‍थान (एनआयओ) सारख्या राष्ट्रीय संस्‍थांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मिरामार येथील एनआयओच्‍या सभागृहात जागतिक समुद्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीएसआयआरचे संचालक डॉ. सुनील कुमार, एनआयओचे संचालक डॉ. सनील कुमार आणि डॉ. सुंदरेशा उपस्‍थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले, जीवसृष्टीत समुद्राचे स्‍थान सर्वोच्च आहे. याचा लाभ केवळ निसर्गालाच नव्‍हे, तर मानवालाही होतो. सागरी दळणवळण, सागरी पर्यटन, मासेमारी, जहाजबांधणी, किनाऱ्यांवरील उद्योग - व्‍यवसाय आदींना याचा मोठा लाभ झाला आहे.

यावेळी डॉ. सुनील कुमार यांनी एनआयओचे उपक्रम, संशोधन आणि कार्यक्रमांचा आढावा घेतला. एनआयओच्‍या स्‍थापना दिनानिमित्त घेतलेल्‍या स्‍पर्धांतील विजेत्‍या स्‍पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच यावेळी ''समुद्र मंथन'' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

CM Pramod Sawant
राजधानी पणजीत बसेसची गती मंदावली

दरम्‍यान, एनआयओच्‍या विविध स्‍पर्धांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्‍याची माहिती यावेळी देण्यात आली. इंग्रजी कविता स्‍पर्धेत वृत्ती नाईक, अपूर्वा पिंपळकर, हिंदीत प्रियांशा गुप्‍ता, लोकप्रिय पांडे यांना बक्षिसे मिळाली. छायाचित्र स्‍पर्धेत प्रेरणा शेट, शर्वणी कुलकर्णी, छायाचित्रण स्‍पर्धेत प्रियांशा गुप्‍ता, बिनवड बेहेरा यांना बक्षिसे देण्यात आली. ट्रेझर हंट स्‍पर्धेत प्रथम हरिश भुर्के, कल्लाथिन एम., कुलदीप कुमार यांना, द्वितीय ओंकार भुर्के, मौमिता घोष, कॉनरॉय आल्‍वारिस, तृतीय निखिल मोहनन, जॉन जुझे, सेथू लक्ष्मी यांना बक्षिसे प्राप्‍त झाली.

प्रश्‍नमंजूषा स्‍पर्धेत रंजन कुमार साहू आणि आकाश सुवारिस यांना प्रथम, अंकूर शर्मा आणि सरूण टीपी यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. कागदावरील शब्‍द स्‍पर्धेत जयेश पाटील, प्रणोय पॉल, आर्ट बझ स्‍पर्धेत निर्मल्‍या मल्ला आणि जेबराणी राजाथी यांनी बक्षिसे मिळवली. सूत्रसंचालन डॉ. ज्‍युडित गोन्‍साल्‍विस यांनी केले.

एनआयओचे समुद्री विज्ञानात मोठे योगदान आहे. ते करत असलेल्‍या समुद्री संशोधनाचा लाभ राज्‍यातील अनेक घटकांना होत आहे. राज्‍यातील उद्योग, मासेमारी, कृषी, शिक्षण, पर्यटन, औषध निर्मिती अशा अनेक घटकांना समुद्री संशोधनाचा लाभ मिळत आहे. राज्‍यातील शेतकऱ्यांनी आणि उद्योजकांनी एनआयओसारख्या राष्ट्रीय संशोधन संस्‍थांच्‍या विविध उपक्रम, कार्यक्रम आणि संशोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com