CM Pramod Sawant: मोरजीचा सर्वतोपरी विकास करू

शिष्टमंडळाशी चर्चेत आश्वासन; पंचायत मंडळासोबत सोपटे यांनी घेतली भेट
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak news

(CM Pramod Sawant) मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्राच्या एकूण नऊही प्रभागांमधील जी-जी विकासकामे असतील ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मोरजी पंचायत मंडळाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
Anti IIT Protest in Sanguem: सांगेतील ‘आयआयटी’विरोधी आंदोलनाला 42 दिवस पूर्ण

मांद्रे मतदारसंघातील समस्या व विकासकामांसंदर्भात माजी आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी पंचायतीच्या सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच मंदार पोके, विलास मोरजे आदिना घेऊन मुख्यमंत्री सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. मोरजी पंचायत क्षेत्राचा विकास अपेक्षेनुसार होत नसल्याने त्यावर उपाययोजनेसाठी येथील विविध प्रश्न घेऊन माजी आमदार सोपटे यांनी मोरजी पंचायत मंडळाशी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोरजी पंचायत क्षेत्राच्या विकासाला सरकारकडून 100 टक्के योगदान दिले जाईल. जी विकास कामे आहेत त्या विकासकामांची यादी लवकरात लवकर सादर करावी. ती कामे केली जातील.

यावेळी मोरजी पंचायत मंडळाने आपापल्या प्रभागांमधील कोणकोणती विकासकामे करण्यात यावीत यावर सविस्तर चर्चा केली.

CM Pramod Sawant
Marigold In Sattari: सत्तरी तालुका ‘झेंडूमय’; दिवाळीत 1 टन फुलांची विक्री

विकासकामांचा खेळखंडोबा

मोरजी पंचायत क्षेत्रातील विकासकामांबाबत अजूनही नवनिर्वाचित पंचायत मंडळ मागे का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ज्या अपेक्षेने नऊ प्रभागांतील ग्रामस्थांनी पंचसदस्यांना निवडून आणले आणि विकासाच्या अपेक्षा ठेवल्या तशा प्रकारचा विकास होत नसल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत.

स्मशानभूमीचा प्रश्न सोडविणार

मोरजी-विठ्ठलदास वाडा या ठिकाणी जी सार्वजनिक स्मशानभूमीची नियोजित जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्यासंबंधी ज्या काही अडचणी आहेत. त्या दूर करण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात मोरजी पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक स्मशानभूमीचा विषय कायमचा सुटणार असल्याने स्थानिक पंचसदस्य विलास मोरजे यांनी समाधान व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com