CM Pramod Sawant

CM Pramod Sawant

Dainik Gomantak

आठ वर्षांत 22 हजार कोटींची विकासकामे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं मयडे येथील जाहीर सभेत आश्वासन

म्हापसा : भाजप सरकारने कोणतीच सामाजिक योजना बंद केली नाही. मागील आठ वर्षांत 22 हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. पेडेला जोडणारा उड्डाणपूल लवकरच उभारला जाईल व त्याबाबत आपण जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हळदोणे मतदारसंघातील मयडे येथे आयोजित भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार ग्लेन टिकलो, आमदार जोशुआ डिसोझा, माजी आमदार रोहन खंवटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>CM Pramod Sawant</p></div>
प्रशासनाच्या दिरंगाईचा गोव्यातील विद्यार्थ्यांना फटका

अनेक जण अच्छे दिन आले नाहीत म्हणून भाजपाला (BJP) लक्ष्य करतात. मुळात बुरे दिन कसे होते, याची तुलना अच्छे दिनांशी केल्यास वास्तुस्थिती लक्षात येईल. राज्यात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मात्र, बाहेरून येणारे पक्ष येथे दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी वेळी केला.

<div class="paragraphs"><p>CM Pramod Sawant</p></div>
....म्हणून विरोधी पक्षांच्या पोटात दुखतयं: प्रमोद सावंत

काही राजकीय नेते गोव्यातील (Goa) देवी शांतादुर्गेची तुलना बंगालच्या व्यक्तीशी करतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांच्या वक्तव्यांवर टीका केली. गोवा राज्यात निवडणुकांनंतर कधीच खून, बलात्कार, दंगली घडल्या नाहीत. त्याच काळात पश्चिम बंगालमध्ये किती गुन्हे दाखल झाले याची कल्पना देशवासीयांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकानंतर 60 खून झाले. त्यामुळे तेथील लोक घाबरुन राज्य सोडून गेले. यावर गोमंतकीयांनी विचार करावा. अशा विचारधारेचे लोक गोव्यात आल्यास काय होईल, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com