पक्षीय राजकारण बाजूला ठेवत मुख्यमंत्री सावंत यांनी केली कॉंग्रेस कार्यकर्त्याला मदत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

राज्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारीची जाणीव ओळखत कोकण रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना संवाद साधून सदर व्यक्तीच्या तिकिटाची सोय करण्यास सांगितली.

पणजी- मडगाव रेल्वेस्थानकावर तीन दिवस अडकलेल्या उत्तराखंडचे काँग्रेसचे कार्यकर्ते भगवानसिंग गुसैन यांनी ट्विटद्वारे केलेल्या मदतीच्या आवाहनाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली. त्यामुळे त्यांना तत्काळ दिल्लीचे (ता. १६ ) रोजीचे तिकीट मिळाले.

भगवानसिंग यांनी आज दुपारी आपल्या पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांना ट्विटद्वारे मदत मागितली . आपण मडगाव रेल्वेस्थानकावर तीन दिवसांपासून अडकलो असून कृपया आपण मदत करावी अशी याचना केली. या ट्विटची दखल भाजप सरकारने घेतली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजकारण किंवा पक्षीय विचार बाजूला ठेवला.

राज्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारीची जाणीव ओळखत कोकण रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना संवाद साधून सदर व्यक्तीच्या तिकिटाची सोय करण्यास सांगितली. त्यानुसार भगवानसिंग यांना सोमवारचे रेल्वेचे तिकीट मिळाले.

तिकीट मिळाल्यानंतर भगवानसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कोकण रेल्वेचे ट्विटद्वारे आभार मानले आहेत.
 

संबंधित बातम्या