Goa Festival: केरीत लोकप्रिय कला जागोर महोत्सवाची मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या हस्ते सुरुवात

Goa Festival: गोव्यात जागोर अकादमी स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Goa Festival | Zagor Festival
Goa Festival | Zagor FestivalDainik Gomantak

Goa Festival: जागोर ही कला लोकप्रिय होत असल्याने जागोरमार्फत संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज आहे. गोव्यात जागोर अकादमी स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोवा जागोर असोसिएशन, श्रीराम वाडेकरी मंडळ, करमळी-केरी आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ल-केरी येथे आयोजिलेल्या दहाव्या जागोर महोत्सवात ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, स्थानिक पंच सदस्य सचिन केरकर, कांचन केरकर, वामन गावडे, जागोर असोसिएशनचे अध्यक्ष हेमू गावडे, श्रीराम वाडेकर मंडळाचे मांडकार उदय गावडे, कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप आणि मान्यवर उपस्थित होते.

आमदार चंद्रकांत शेट्ये गोविंद गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जागोर कलाकार रामदास कामत, बाबुली गावडे, भगवंत गावडे, मधुकर कुंकळीकर, कृष्णा काणकोणकर, रघुवीर गावडे या सहा कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

जागोर संस्कृती लिखित स्वरूपात

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मंत्री गावडे हे लोककलेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संस्कृती टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत. जागोर ही एक पारंपरिक कला असून समाजात ज्या घडामोडी घडतात, त्या व्यासपीठावर मांडण्याची संधी जागोरच्या माध्यमातून मिळते. मौखिक स्वरूपात असलेली जागोरातील संस्कृती लिखित स्वरूपात असणे महत्त्वाचे असून ते काम अकादमीतर्फे केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com