फुकटात काही मिळणार नाही; स्वच्छ, नितळ गोव्यासाठी जनतेने शिस्त पाळावी : मुख्यमंत्री

कुंडई येथे बायोटेक कंपनीतर्फे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
फुकटात काही मिळणार नाही; स्वच्छ, नितळ गोव्यासाठी जनतेने शिस्त पाळावी : मुख्यमंत्री
Cm Pramod SawantDainik Gomantak

पणजी : आम्हाला गोवा स्वच्छ आणि नितळ हवं आहे. हे केवळ सरकारच्या पैशांनी होणार नाही. त्यामुळे स्वच्छ सुंदर गोव्यासाठी जर आपल्यावर थोडा आर्थिक बोजा पडणार असेल तर तो सहन करण्याची तयारी सर्वसामान्य गोमंतकीय जनतेने ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. कुंडई येथे बायोटेक कंपनीतर्फे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचे मुखमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं, या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

आपल्याला सर्वकाही फुकटात मिळणार नाही. जर फुकटात मिळालं तर त्याची आपल्याला किंमत नसते. यासाठी गोमंतकीयांनी सर्वात आधी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा नदीच्या पाण्यात टाकणं बंद करावं, असंही मुख्यमंत्र्यांनी गोवेकरांना आवाहन केलं.

मागील सरकारने गेल्या 50 वर्षात कचऱ्याबाबत कोणतंही नियोजन न केल्यामुळे आज आपल्याला मडगाव, नावेली परिसरात डोंगर दिसत आहेत. मात्र आता हे चित्र बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Cm Pramod Sawant
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी कालवश

गोव्याला मुक्ती मिळून 60 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही म्हणतो की गोवा हे प्रगतीशील राज्य आहे. गोव्यात औद्योगिक क्रांती झाली आणि आम्हाला लागतील तशा आम्ही नवनवीन गोष्टी सुरु करत गेलो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की गोव्यातील प्रत्येक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मी पाहिलेला आहे. जेव्हा पहिल्या प्रकल्पाचं मुहूर्तमेठ रोवली गेली त्यावेळी मी साधनसुविधा महामंडळाचा अध्यक्ष होतो. यानंतर दुसऱ्या प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मी महामंडळाचा अध्यक्ष आणि गोव्याचा मुख्यमंत्रीही होतो, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

औद्योगिक कचऱ्यासाठी आम्ही पिसुर्लेत प्रकिया प्रकल्प तर बायोमेडिकल कचऱ्यासाठी कुंडईमध्ये प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. साळगावात आम्ही उभारलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आशियात सर्वात मोठा प्रकल्प आहे, आणि देश-विदेशातून या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी लोक येत असतात याचा आम्हाला अभिमान आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Cm Pramod Sawant
देशाला आघाडीचे सागरी राष्ट्र बनवणार: श्रीपाद नाईक

कुंडईत बांधण्यात आलेला बायो मेडिकल प्रक्रिया प्रकल्प हा 100 टक्के पीपीपी स्वरुपाचा प्रकल्प असून सरकारला यात एक रुपयाही गुंतवावा लागला नाही. तसंच पुढची 20 वर्षं या प्रकल्पाचा खर्च सरकारला करावा लागणार नाही. सरकारने केवळ जागेमध्ये गुंतवणूक केली असून प्रकल्पही 20 वर्षांनंतर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या धोरणानुसार सरकारला परत मिळणार आहे. गोव्यात एकापेक्षा एक अशा पद्धतीचे घनकचरा प्रकल्प असून जर केंद्राने याचं रँकिंग काढलं तर निश्चितच गोवा पहिल्या स्थानी असेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.