CM Pramod Sawant: कपड्यांच्या विविध ब्रँडना उत्तेजन देण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; फोंडा येथे 'फर्स्ट क्राय'च्या स्टोअरचे उद्घाटन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

वास्को : कपड्यांच्या विविध ब्रँडस्ना उत्तेजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केले. 'फर्स्ट क्राय डॉट कॉम' या बेबी आणि किड्ससाठीच्या कपड्यांपासून खेळण्यांपर्यंतच्या विविधांगी उत्पादनांच्या सर्वात मोठा संग्रह असणाऱ्या स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत बोलत होते.

CM Pramod Sawant
Vijai Sardesai: 'ही' जाहिरात गोवेकरांची संधी कमी करण्यासाठी?

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सार्थक गार्डन, फार्मागुडी हायवे, बायपास रोड, फोंडा येथे नुकतेच करण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, कृषी हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक, वीज व गृहनिर्माण मंत्री सुदीन ढवळीकर, फर्स्ट क्रायचे व्यवस्थापक मुजम्मिल अवती व इतर मान्यवर उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa Shipyard: ''गोवा शिपयार्डला 'निवासी दाखला' देऊन मोठी चूक''

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कपड्यांचे विविध ब्रँड गोव्यात येत आहेत. त्यांना उत्तेजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण या कंपन्यामुळे नोकरी व्यवसायांना चालना मिळेल. तसेच अशा कंपन्यांना अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. या स्टोरमध्ये बेबी आणि किडस् उत्पादनांचा सर्वात मोठा संग्रह आहे. त्याचा लाभ फोंडा व इतर भागातील ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. याप्रसंगी मंत्री नीलेश काब्रल, मंत्री रवी नाईक यांचीही समयोजित भाषणे झाली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिबिन कापून तसेच दीपप्रज्वलन करून फर्स्टक्राय डॉट कॉमच्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत समीर किनळेकर यांनी केले. आभार प्रदर्शन सुजया किनळेकर यांनी केले. उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com