Goa CM on Ration Scam: धान्य घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांनी केले मोठं विधान; म्हणाले नागरी पुरवठा खाते...

स्वस्त धान्य दुकानदार सामिल असल्याचा आरोप
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

गेले काही दिवस गोवा राज्यात कर्नाटक राज्यात होत असलेल्या धान्य घोटाळ्यावरुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर आतातरी कारवाई करणार का ? असा संतप्त सवाल आमदार विजय सरदेसाईंनी केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केले असून स्वस्त धान्य दुकानदार आपले धान्य परस्पर विकत असल्याचं म्हटले आहे.

(CM pramod sawant informs seized grain has no connection with Goa govt)

CM Pramod Sawant
Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

याबाबत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, गुन्हेगारी विशेष पथकाने धान्य तस्करीमध्ये ताब्यात घेतलेल्या धान्याचा राज्याच्या खात्याशी कोणताही संबंध नाही. तर स्वस्त धान्य दुकानदार आपल्याकडील राहिलेले धान्य बाहेर परस्पररित्या विकत असल्याचे दिसून आले आहे असे म्हटले आहे.

CM Pramod Sawant
Vijai Sardesai On Mhadei: ...अन्यथा बार्देश, सांगेचा पाणीप्रश्न पेटणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले आहे. याची चौकशी सुरु आहे. त्यामूळे सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या गोवा प्रशासन आणि ताब्यात घेतलेले धान्य याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणातून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com