गोवा सरकारचा कोविडग्रस्तांना मदतीचा हात

राज्यातील जनतेचे डबडबलेले डोळे, थरथरणारे हात, आणि आवरलेले हुंदके अशा भावपूर्ण स्थितीत गोवा सरकारचा जनतेला मदतीचा
CM Pramod Sawant Presented Sanction order Rs 2 Lakhs to families who lost a member due to COVID-19
CM Pramod Sawant Presented Sanction order Rs 2 Lakhs to families who lost a member due to COVID-19

पणजी: राज्यातील (Goa) जनतेचे डबडबलेले डोळे, थरथरणारे हात, आणि आवरलेले हुंदके अशा भावपूर्ण स्थितीत गोवा सरकारने (Goa Government) जनतेला मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत त्यांना मदतीचा हात दिला.

सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने आयोजित कोविड रिलीफ कार्यक्रम काल पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पार पडला. झालेल्या कोविड रिलीफ कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात covid-19 मृत्यू पावलेल्या 46 व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि याचे स्वीकृतीपत्र देण्यात आले. याच कार्यक्रमात कोविड च्या काळात पारंपारिक व्यवसाय अडचणीत आलेल्या 26 व्यक्तींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले. 

CM Pramod Sawant Presented Sanction order Rs 2 Lakhs to families who lost a member due to COVID-19
Goa: उद्योजकता क्षेत्रातील संधीचा महिलांनी लाभ घ्यावा; मंत्री विश्वजित राणे

गोव्यात  कोविड मृत्यू रिलीफ योजनेसाठी 471 अर्ज आले असून त्यापैकी 349 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 57 व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा केले असून 120 व्यक्तींचे अर्ज आरोग्य खात्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोविडच्या काळात पारंपरिक व्यवसाय थंडवलेल्या 2 हजार 618 व्यक्तींच्या अर्ज खात्याकडे आले असून त्यापैकी 722 अर्जाची पडताळणी पूर्ण झाली. त्यापैकी 120 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज पुढील आठवड्यात मंजूर करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या योजनेसाठी 100 ते 120 कोटी रुपये अपेक्षित खर्च करण्यात आला आहे.  

CM Pramod Sawant Presented Sanction order Rs 2 Lakhs to families who lost a member due to COVID-19
Goa Tourist: जीवरक्षकांनी वाचविला दिल्लीच्या पर्यटकांचा जीव

आमचे सरकार अंत्योदय पद्धतीने काम करत आहे. समाजातील गरीब आणि वंचित व्यक्तींची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. असे सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी कोविड काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. त्यांची प्राधान्याने अंमलबजावणी करत आहे. बाहेरचे लोक गोव्यात येऊन चंद्र-तारे तोडून देण्याची भाषा करत आहे त्यांना माहिती आहे. त्यांचे सरकार कधीच येणार नाही. त्यामुळे ते अशा प्रकारच्या घोषणा करत आहे असा टोला मुख्यमंत्री सावंत यांनी नाव न घेता केजरीवाल यांना लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com